पुणे MNS : पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनसे नेते वसंत मोरे यांंनी सिद्धार्थ बहुउद्देशीय सोसायटीचं कार्यालय फोडलंय. छत्तीसगड येथील एका जोडपं पुण्यात पळून आलं होतं. तेव्हा एका मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलीला पाच दिवस कोंडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महिना उलटूनही आरोपींना अटक न झाल्यानं मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले. वसंत मोरे यांनी आज आरोपींच्या मालकीच्या कार्यलयात तोडफोड केलीय.
तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार, तसंच कमलेश तिवारी अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी दहावीत शिकत असून ती तिच्या प्रियकरासोबत पुण्यात आली होती. त्यावेळी तिघांनी या जोडप्याला पकडून पोलिसांकडं नेलं होतं. पोलीस कर्मचारी अनिल पवार यांनी त्यांना बराच वेळ त्यांना डांबून ठेवलं होतं. यानंतर पोलीस कर्मचारी पवार यांनी अल्पवयीन मुलगी, तिच्या प्रियकराला इमारतीतील एका खोलीत नेलं. यानंतर त्यानं मुलीला वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी पुण्यात येऊन मुलीची सुटका केली होती.
वसंत मोरे आक्रमक : घटनेला महिना उलटून गेला तरी आरोपींना अटक न झाल्यानं मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झालं आहेत. त्यांनी आरोपीच्या पत्नीच्या नावावर असलेल्या सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीच्या पुण्यातील कार्यालयात तोडफोड केलीय. सिद्धार्थ बहुउद्देशीय सोसायटी हरवलेल्या तसंच पळून आलेल्या व्यक्तींना ठेवलं जात. त्यानंतर त्यांच्या घरचा पत्ता शोधून त्यांना घरी पाठवण्याचं काम या संस्थेमार्फत करण्यात येत. या इमारतीत रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेल्या प्रवाशांना ठेवण्यात आलं आहे.
आरोपीला पकडा : येत्या दोन दिवसांत फरार आरोपी पोलीस न सापडल्यास पुढील प्रकरणाची जबाबदारी आरपीएफ प्रमुखांची राहील, असा इशारा वसंत मोरेंनी दिलाय. रेल्वे पोलिसांना या घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपीवर तात्काळ कारवाई करावी असं मोरेंनी म्हटंलय. सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा -