ETV Bharat / state

Pune Metro E Cycle : मेट्रोकडून पुणेकरांसाठी ई सायकल हजर - pune e cycle online

पुण्यात येत्या काही दिवसांत मेट्रो सुरु होणार ( Pune Metro Start ) आहे. त्यातच आता, मेट्रोकडून पुणेकरांसाठी ई-सायकली उपलब्ध करण्यात आलेल्या ( Pune Metro E Cycle ) आहेत. गरवारे मेट्रो स्टेशन जवळ हे सायकल स्टँड ( Garware Metro Stattion Pune ) आहे.

Pune Metro E Cycle
Pune Metro E Cycle
author img

By

Published : Jan 21, 2022, 2:25 AM IST

पुणे - पुणेकरांची बहुप्रतिक्षित मेट्रो लवकरच प्रवासासाठी उपलब्ध होणार ( Pune Metro Start ) आहे. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेट्रो कडून पुणेकरांना भाडे तत्वावर ई- सायकली मिळणार ( Pune Metro E Cycle ) आहेत. गरवारे मेट्रो स्टेशन जवळ हे सायकल स्टँड ( Garware Metro Stattion Pune ) असून, सध्या येथे दहा सायकल उपलब्ध आहेत. याबाबत पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट जनरल मॅनेजर हेमंत सोनवणे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.

हेमंत सोनवणे म्हणाले, या सायकली युनो बाईक आणि माय बाईक या दोन कंपन्यांच्या आहेत. ॲपद्वारे या सायकली ऑपरेट होत असून, त्यांना प्रति तास पाच रुपये भाडे आहे. नागरिकांना याचा साप्ताहिक, मासिक किंवा दीर्घकालीन पास देखील काढता येऊ शकतो. या सायकलींचा मेंटेनन्स खर्च सदर दोन्ही कंपन्या करणार आहेत. कंट्रोल सेंटरमध्ये सायकल कोठे आहे कोणती सायकल खराब झाली आहे, याची माहिती मिळते.

असा करु शकता वापर

पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट जनरल मॅनेजर हेमंत सोनवणे यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

या सायकलींचे क्यू आर कोड द्वारे लॉक उघडता येते. जेव्हा आपण ॲपद्वारे सायकलचे भाडे भरतो तेव्हा हे लॉक उघडते. मग आपण ही सायकल आपण वापरू शकतो. तसेच, येत्या काळामध्ये महा मेट्रो तर्फे स्कूटर आणि रिक्षा देखील पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.पी.एम.पी.एम.एल सोबत देखील त्यांचे मार्ग मॉडीफाय करणार आहे. यासाठी ॲप तयार केले आहे. त्या ॲप द्वारे ई सायकली, ई रिक्षा आणि पीएमपीएलच्या ( Pune Pmpml Bus Timetable ) बसेस या मेट्रोच्या वेळापत्रकानुसार उपलब्ध होतील. हे सर्व एका ॲप द्वारे शक्य होणार आहे.

हेही वाचा - Amol Kolhe Reacted On Godase Role : राजकारण आणि अभिनयाची गल्लत करू नका - खासदार अमोल कोल्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.