ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: संभावित रुग्णांसाठी पुणे वैद्यकीय प्रशासन सज्ज... - कोरोना व्हायरस बातमी

सद्या 500 आयसीयूची सुविधा आहे. हा आकडा 1 हजार 372 पर्यंत वाढविला जाणार आहे. तर 250 व्हेंटिलेटर आहेत. याची संख्या वाढवून 500 करण्याचे नियोजन आहे.

pune-medical-administration-ready-for-corona
कोरोना
author img

By

Published : Jul 6, 2020, 7:13 PM IST

पुणे- पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येकी 1 लाख अँटीजन टेस्टिंग किट आणले आहेत. त्याद्वारे टेस्टिंग वाढविण्यावर भर दिला जात आहे. पुणे आणि परिसराचा विचार केला तर, 1 हजार 789 ऑक्सिजनेटेड बेड सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यात वाढकरुन 3 हजार 208 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या केली जाणार आहे. साधारण 15 जुलैपर्यंत ही व्यवस्था वाढवली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी सांगितले.

संभावित रुग्णांसाठी पुणे वैद्यकीय प्रशासन सज्ज...

सद्या 500 आयसीयूची सुविधा आहे. हा आकडा 1 हजार 372 पर्यंत वाढविला जाणार आहे. तर 250 व्हेंटिलेटर आहेत. याची संख्या वाढवून 500 करण्याचे नियोजन आहे. पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर, सह्याद्री रुग्णालय, रुबी रुग्णालय, केईएम, सुर्या, जहांगीर, कोलंबिया, एशिया रुग्णालय अशा खासगी रुग्णालयात आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयात नव्या कोरोना रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या या ठिकाणी 600 बेडची क्षमता आहे. त्यातील 100 ते 125 बेड सध्या कार्यन्वित आहेत. तर येत्या काही दिवसात आणखी 200 बेड उपलब्ध होणार आहेत. यात 100 बेड हे ऑक्सिजनेटेड तर 80 बेड आयसीयूचे असणार आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे 40 आयसीयू बेड तर 11 क्वारंटाईन सेंटर कार्यान्वित आहेत. त्यात 2 हजारच्या जवळपास बेड आहेत.

महानगरपालिकेच्या रुग्णालयातील बेड संख्या...

pune-medical-administration-ready-for-corona
थर्मल स्क्रिनिंग...

वायसीएममध्ये 600 बेड, भोसरी रुग्णालयात 100 बेड.

खासगी रुग्णालयातील बेड संख्या...

स्टर्लिंग रुग्णालय 100, लोकमान्य हॉस्पिटल-100, आदित्य बिर्ला 250 बेड आहेत. खासगी रुग्णालयात सरकारी दरा प्रमाणे 4 हजार रुपये दिवसाला घेतले जातात. तर रुग्णाला त्रास असेल किंवा प्रकृती खालावली तर इतर खर्च वेगळा असतो. सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार कोव्हिड टेस्टचे खासगी लॅबमध्ये 2 हजार 800 रुपये घेतले जात आहेत.

हेही वाचा- चिंताजनक! राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.