पुणे - राज्य सरकारने आजपासून सर्व धर्मिकस्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुण्यातील गुरुवार पेठेतील मक्का मशीद आजपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशीद ट्रस्टकडून नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासोबतच थर्मामिटर चेकिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नमाज पठणसाठी येणाऱ्या नागरिकांना विनामास्क तसेच 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मशिदीमध्ये प्रवेश दिला जात नाही. नागरिकही नियमांचे पालन करत मशिदीत प्रवेश करत आहेत.
नियमांचे पालन करून पुण्याच्या गुरुवार पेठेतील मक्का मशीद सुरू - पुण्यातील मशिद उघडली न्यूज
राज्य सरकारने आजपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. पुण्यातील सर्वात जुनी मक्का मशिदही आजपासून नमाजसाठी खुली करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन मशिदीमध्ये प्रवेश दिला जात आहे.