पुणे - पुण्यातील विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे ०४ कार, ०४ लक्झरी बस, ०१ टेम्पो, ०१ डंपर अशी एकूण १० वाहने पेटल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलांकडून आग विझवण्याचे काम काम सुरू आहे. फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारात आज दुपारी अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. रविवार आणि मकर संक्रांतीच्या सुट्टीत कार्यालय बंद असते. त्यामुळे ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली नाही. परिसरात धुराचे लोट पसरत असल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आरटीओने जप्त केलेली 10 वाहने आगीत जळून खाक झाली होती. त्यात 4 लक्झरी बस, 4 कार, 1 टेम्पो आणि 1 डंपरचा समावेश आहे.
कुठलीही जीवित हानी नाही - आरटीओ कार्यालयाच्या आगी मध्ये चार कार चार लक्झरी बस एक टेम्पो एक डंपर अशी एकूण दहा वाहने पेटली आहे. त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे धूर या भागामध्ये पसरलेले दिसत होते. आगेची भीषणता खूप असल्याने या आगीमध्ये सगळ्याच गाड्या जळून खाक झाले आहेत.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट - आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून जप्त करण्यात आल्या होत्या त्याच गाड्यांना आग लागली आहे. याच गाड्यांना आग कशी लागली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंकर संक्रातीमुळे परिवहन विभाच्या कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे घटनास्थली जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे या आगीमागचे कारण काय? याची चौकशी करण्यात येणार आहे.