ETV Bharat / state

Pune drown death : फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा टाटा धरणात बुडून मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 10:41 AM IST

Two Youths Drowned : लोणावळा परिसरातील टाटा धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, धरणात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाला सायंकाळी यश आले.

Two Youths Drowned
फिरण्यासाठी आलेल्या दोघांचा टाटा धरणात बुडून मृत्यू

लोणावळा Pune drown death : लोणावळा परिसरातील टाटा धरणात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यु पथकाला यश आलंय. विवेक छत्री ( वय 21, रा. ओळकाईवाडी), करण कुंवर (वय 20, या. ओळकाईवाडी) अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहेत. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने झाला मृत्यू : विवेक व करण आपल्या मित्रांसह लोणावळा धरणाजवळ फिरण्यास आले होते. रविवारी दुपारी पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने विवेक आणि त्याचा मित्र करण हे पाण्यात बुडाले. तसंच या दोघांसोबत आलेल्या अन्य एकास वाचविण्यात यश आलंय. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व शिवदुर्ग मित्र पथकाचे सदस्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होताच बचाव कार्य सुरू केलं. परेश भरतसिंह भूल (वय-१८, रा. लोणावळा) यांनी झालेल्या घटनेची माहिती पोलिसात दिली होती.

घटनेची माहिती समजताच शिवदुर्ग पथकाच्या सदस्यांनी घेतली धाव : धरणात मुलं बुडाल्याची माहिती समजताच शिवदुर्ग पथकाचे सदस्य अजय शेलार, महेश म्हसणे, सागर कुंभार, मनोहर ढाकोळ, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशु तिवारी यांनी घटनास्थळी धाव घेत मुलांना बाहेर काढलं. मात्र नाका तोंडात पाणी गेल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तसंच घटनेची माहिती समजतात पोलीस निरीक्षक सिताराम डुबल व पोलीस पथक तेथे दाखल झाले. दरम्यान, टाटा धरणाच्या मागील बाजूला लोणावळा परिसरातील काही नागरिक मद्यप्राशन तसेच गांजासारखे गुंगीवर्धक पिण्यासाठी बसत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासनाने टाटा धरणाच्या मागील बाजूला दिवसा गस्त वाढवत नशाखोरांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. Brother Sister Drown in Lake: कुत्र्याला तलावात आंघोळ घालायला गेले अन् स्वत:च बुडाले; बहीण-भावाचा मृत्यू
  2. Two Youths Drowned : नांदेड शहराजवळ असलेल्या असना नदी पात्रात दोन युवकांचा बुडून मृत्यू
  3. Drowning In Begusarai : नदीत अंघोळीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.