ETV Bharat / state

निकाल विधानसभा निवडणूक २०१९ : अनेक अर्थाने पुण्याच्या राजकारणातले बदल दाखवणारी निवडणूक - पुणे जिल्हा राजकारण

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने 10 मतदारसंघ जिंकत पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले होते. 2014 मध्ये 21 विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीने ही कसर भरून काढली आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजय साजरा करताना कार्यकर्ते
author img

By

Published : Oct 25, 2019, 7:44 PM IST

पुणे - राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर, पुणे शहरातील उपनगरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजय साजरा करताना कार्यकर्ते

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने 10 मतदारसंघ जिंकत पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले होते. 2014 मध्ये 21 विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीने ही कसर भरून काढली आहे.

हेही वाचा - मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी

ग्रामीण भागात 2014 च्या निवडणुतीत शिवसेनेला चांगले यश मिळाले होते. ग्रामीण भागातल्या 13 पैकी ३ जागांवर शिवसेना विजयी झाले होते. तसेच मनसेला १ जागा मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचा पुणे जिल्ह्यातून सुपडा साफ झाला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातल्या 8 पैकी २ जागा जिंकत पुन्हा एकदा शहरात आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या ग्रामीण भागात ३ जागा होत्या, या ३ जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, यावेळच्या निवडणुकीत मात्र शहरातल्या भाजपच्या २ जागा कमी झाल्या आहेत.

हेही वाचा - पिंपरीतील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंचा विजय

पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघातील निकालाची वैशिष्ट्ये -
1. बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार प्रचंड मताधिक्याने विजयी.
2. अजित पवार तब्बल 1 लाख 65 हजार 265 मतांच्या मताधिकक्याने विजयी, सर्व विरोधकांचे डिपॉजिट जप्त...
3. बाळा भेगडे, विजय शिवतारे हे मंत्री पराभूत...
4. काँग्रेसमधून भाजप मध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव...
5. ग्रामीण भाग पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात...
6. शिवसेना जिल्ह्यातून गायब...
7. मावळमध्ये 25 वर्षानंतर भाजपचा पराभव...

पुणे ग्रामीण -- 2019
1. भोर - संग्राम थोपटे, काँग्रेस
2. बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
3. इंदापूर - दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
4. पुरंदर - संजय जगताप, काँग्रेस
5. दौंड - राहुल कुल, भाजप
6. शिरूर - अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
7. जुन्नर - अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस
8. आंबेगाव - दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
9. खेड-आळंदी - दिलीप मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस
10. भोसरी - महेश लांडगे, भाजप
11. पिंपरी - अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस
12. चिंचवड - लक्ष्मण जगताप, भाजप
13. मावळ - सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे शहर -- 2019
1. कसबा- मुक्ता टिळक, भाजप
2. कोथरूड - चंद्रकांत पाटील, भाजप
3. पुणे कॅन्टोन्मेंट - सुनिल कांबळे, भाजप
4. पर्वती - माधुरी मिसाळ, भाजप
5. खडकवासला - भीमराव तापकीर, भाजप
6. हडपसर - चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस
7. वडगावशेरी - सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस
8. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे, भाजप

पुणे ग्रामीण -- 2014
1. भोर - संग्राम थोपटे,काँग्रेस
2. बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
3. इंदापूर - दत्ता भरणे, अपक्ष
4. पुरंदर - विजय शिवतारे, शिवसेना
5. दौंड - राहुल कुल, रासप
6. शिरूर - बाबुराव पाचर्णे, भाजप
7. जुन्नर - शरद सोनवणे, मनसे
8. आंबेगाव - दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
9. खेड-आळंदी - सुरेश गोरे, शिवसेना
10. भोसरी - महेश लांडगे, अपक्ष
11. पिंपरी - गौतम चाबुकस्वार, शिवसेना
12. चिंचवड - लक्ष्मण जगताप, भाजप
13. मावळ - बाळा भेगडे, भाजप

पुणे शहर -- 2014
1. कसबा - गिरीश बापट, भाजप
2. कोथरूड- मेधा कुलकर्णी, भाजप
3. पुणे कॅन्टोन्मेंट - दिलीप कांबळे, भाजप
4. पर्वती-माधुरी मिसाळ, भाजप
5. खडकवासला - भीमराव तापकीर, भाजप
6. हडपसर - योगेश टिळेकर, भाजप
7. वडगावशेरी - जगदीश मुळीक, भाजप
8. शिवाजीनगर - विजय काळे, भाजप

हेही वाचा - 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'

Intro:अनेक अर्थाने पुण्याच्या राजकारणातले बदल दाखवणारी निवडणूकBody:mh_pun_03_scinario_pune_vidhansbha_pkg_7201348

anchor
पुणे जिल्ह्या हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा 2019 च्या या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे तसेच पुणे शहरातील उपनगरातही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले आहे पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने 10 मतदार संघ जिंकत पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले होते 2014 मध्ये 21 विधानसभा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या मात्र ही तूट या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भरून काढली आहे ग्रामीण भागात 2014ला शिवसेनेला चांगले यश मिळाले होते ग्रामीण भागातल्या 13 पैकी तीन जागांवर शिवसेना विजयी झाले होते तसेच मनसेला एक जागा मिळाली होती मात्र या निवडणुकीत शिवसेनेचा पुणे जिल्ह्यातून सुपडा साफ झाला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातल्या 8 पैकी दोन जागा जिंकत पुन्हा एकदा शहरात आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे भाजपच्या ग्रामीण भागात तीन जागा होत्या या तीन जागा राखण्यात भाजपला यश आले आहे मात्र पुणे शहरातल्या आठ पैकी आठ जागा जिंकत 2014 च्या निवडणुकीत मोठी खळबळ उडवून दिल्यानंतर 2019 मध्ये मात्र भाजपच्या दोन जागा शहरातल्या कमी झाले आहे......

पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघातील निकालाची वैशिष्ट्ये --
1 बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार प्रचंड मताधिक्याने विजयी..
2 अजित पवार तब्बल 1लाख 65हजार 265 मतांच्या मताधिकक्याने विजयी सर्व
विरोधकांचे डिपॉजिट जप्त...
3 बाळा भेगडे, विजय शिवतारे हे मंत्री पराभूत....
4 काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव..
5 ग्रामीण भाग पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात..
6 शिवसेना जिल्ह्यातून गायब..
7 मावळ मध्ये 25 वर्षानंतर भाजपचा पराभव...

*पुणे ग्रामीण -- 2019*
1 भोर - संग्राम थोपटे,काँग्रेस
2 बारामती - अजित पवार , राष्ट्रवादी
3 इंदापूर - दत्ता भरणे, राष्ट्रवादी
4 पुरंदर - संजय जगताप, काँग्रेस
5दौंड - राहुल कुल, भाजप
6शिरूर - अशोक पवार,राष्ट्रवादी
7जुन्नर - अतुल बेनके, राष्ट्रवादी
8आंबेगाव - दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
9खेड-आळंदी -दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
10भोसरी - महेश लांडगे - भाजप
11पिंपरी - अण्णा बनसोडे,राष्ट्रवादी
12चिंचवड- लक्ष्मण जगताप, भाजप
13मावळ- सुनील शेळके,राष्ट्रवादी

पुणे शहर --
1 कसबा- मुक्ता टिळक, भाजप
2 कोथरूड- चंद्रकांत पाटील,भाजप
3 पुणे कॅन्टोन्मेंट-सुनिल कांबळे, भाजप
4 पर्वती-माधुरी मिसाळ,भाजप
5 खडकवासला- भीमराव तापकीर, भाजप
6 हडपसर- चेतन तुपे, राष्ट्रवादी
7 वडगावशेरी- सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
8 शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे,भाजप
-------------
*पुणे ग्रामीण -- 2014*
1 भोर - संग्राम थोपटे,काँग्रेस
2 बारामती - अजित पवार , राष्ट्रवादी
3 इंदापूर - दत्ता भरणे, अपक्ष
4 पुरंदर - विजय शिवतारे, शिवसेना
5दौंड - राहुल कुल, रासप
6शिरूर - बाबुराव पाचर्णे, भाजप
7जुन्नर - शरद सोनवणे, मनसे
8आंबेगाव - दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
9खेड-आळंदी - सुरेश गोरे - शिवसेना
10भोसरी - महेश लांडगे - अपक्ष
11पिंपरी - गौतम चाबुकस्वार, शिवसेना
12चिंचवड- लक्ष्मण जगताप, भाजप
13मावळ- बाळा भेगडे, भाजप

पुणे शहर --
1 कसबा- गिरीश बापट, भाजप
2 कोथरूड- मेधा कुलकर्णी,भाजप
3 पुणे कॅन्टोन्मेंट-दिलीप कांबळे, भाजप
4 पर्वती-माधुरी मिसाळ,भाजप
5 खडकवासला- भीमराव तापकीर, भाजप
6 हडपसर - योगेश टिळेकर, भाजप
7 वडगावशेरी-जगदीश मुळीक,भाजप
8 शिवाजीनगर-विजय काळे,भाजप

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.