पुणे: सध्या सायबर चोरट्यांकडून नागरिकांना विविध आमिषे दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. सायबर चोरटे विदेशातील गिफ्ट, नोकरी, महागड्या वस्तू, जादा परतावा, इन्शुरन्स पॉलिसी, डॉलर, पेटीएम व बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करत आहेत. हे सुरू असले तरी, सध्या या चोरट्यांची नवीन पद्धत वापरली आहेत. तुम्हाला सुरवातीला काही पैसे देतात आणि मग हळूहळू पैसे दिल्यावर अचानकच मोठी रक्कम ते खात्यातून काढून घेतात. तेव्हा समजते की आपली फसवणूक झाली आहे.
कशी होती फसवणूक: तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येतो. ज्यात हाय, हॅलो म्हटले जाते आणि याला तुम्ही उत्तर दिल्यास तुम्हाला मी ऑलिव्ह बोलत आहे. मी जास्त नाही काही मिनिटच तुमची वेळ घेईल असे सांगितले जाते. तुम्हाला अर्न आणि लर्न आणि घर बसल्या कामाबाबत सांगितल जाते. तुम्हाला एक टास्क सांगितला जातो, ज्यात सुरवातीच्या 3 टास्क फ्री दिल्या जातात. तुम्हाला काही टास्क सांगितले जातात, ज्यातून तुम्हाला 2 हजार ते 10 हजार पैसे मिळतील असे सांगितले जाते. तुम्ही ते टास्क केल्यावर ते तुम्हाला पैसे वाढवून देतात. नंतर एक मोठ्या रकमेचा टास्क देतात आणि तुमचे जेवढे पैसे आहे ते काढून घेतात. अश्या पद्धतीने फसवणूक केली जात आहे.
तीन गुन्हे दाखल: पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी जस सेक्सटॉर्शनच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सायबर पोलिसांकडे प्राप्त झाले होते. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना सध्या शहरात घडत आहे. पुण्यातील सायबर पोलीस स्टेशन येथे याबाबतचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिल्या गुन्हामध्ये तक्रारदाराचे एक कोटी दहा लाख गेले आहे. तर दुसऱ्या तक्रारीत 47 लाखांची फसवणूक झाली आहे. तर तिसऱ्या घटनेत 9 ते 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तसेच लाख दोन लाखाच्या फसवणुकीच्या तक्रारीही पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहे.
१० हजार तक्रारींची नोंद: मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अवघ्या चार महिन्यांत विविध सायबर गुन्ह्यांच्या १० हजार तक्रारींची नोंद झाली आहे. पुणे पोलीसांचा सायबर विभाग सतत जनजागृती करुन नागरिकाना या आमिषाना बळी पडू नये, यासाठी काम करत आहे. पण याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या या नव्या सायबर फसवणुकीने अनेक लोकांचे नुकसान झाले आहे.अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक मिनल पाटील यांनी दिली आहे.
मेसेज आला तर दुर्लक्ष करावे: तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा पद्धतीचा जर आपल्याला मेसेज आला तर आपण याकडे दुर्लक्ष करावे. कारण आपण जर आठ-आठ तास नोकरी करून आपल्याला काही रक्कम हे पगाराच्या स्वरूपात भेटत असेल तर, अचानक कोण एका मेसेजवर आपल्याला एवढी मोठी रक्कम देईल का? याचा विचार देखील नागरिकांनी करावा. असे काही घडत असेल तर संबंधित पोलीस स्टेशनवर संपर्क साधावा असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.