ETV Bharat / state

पुण्यात किरकोळ वादातून मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर - youth was shot at in a dispute

Pune Crime : पुण्यात गोळीबाराची घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झालाय. मात्र या प्रकारामुळं बाणेर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

youth was shot at in a dispute in pune
पुण्यात किरकोळ वादातून गोळीबार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:23 AM IST

Updated : Nov 20, 2023, 10:59 AM IST

पुणे Pune Crime : पुण्यातील बाणेर परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा सगळा प्रकार बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेलजवळ रविवारी (19 नोव्हेंबर) मध्यरात्री घडला. आकाश पोपट बाणेकर असं जखमीचं नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा 1 जिवंत राऊंड आणि 2 केसेस जप्त केल्या आहेत. तसंच याप्रकरणी निलेश दत्तात्रय पिंपळकर यांच्या तक्रारीवरुन चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे या दोघांना अटक करण्यात आलीय.

कशी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश पिंपळकर आणि रोहीत ननावरे हे दोघं एकाच भागात राहतात. तसंच दोघंही एकाच कंपनीत काम करतात. मात्र, काही दिवसांपूर्वी रोहितला कंपनीतून काढले गेले. त्यामुळं रोहितला निलेशमुळे कामावरून काढून टाकल्याचा गैरसमज झाला होता. या गैरसमजुतीतून रोहितनं निलेशला महाबळेश्वर हॉटेल समोरील 45 अव्हेन्युव बिल्डींग जवळ भेटण्यास बोलावले. यावेळी निलेश आणि रोहितमध्ये वाद झाला. त्यावेळी निलेशने आकाश बाणेकरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. आकाशने रोहितची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित तिथून रागाच्या भरात निघून गेला अन् आपले मित्र अदित्य रणावरे, सागर बनसोडे यांना घेऊन आला. आदित्य, सागर यानी त्यांना शिवीगाळ करत गोळीबार केला.

  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू : सदरील हल्ल्यात आकाश बाणेकर याच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागली. त्यामुळं तो गंभीर जखमी झाला. लवळे येथील कासारसाईमध्ये असलेल्या एका रुग्णालयात आकाशवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Pune Crime : दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर गोळीबार, कोट्यवधीचं सोनं लुटलं!
  2. Pune Crime : पिझ्झा द्यायला उशीर झाल्यानं ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण, हवेत गोळीबार करून केली दहशत
  3. IT Raids Pune: पुण्यातील निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; 40 वाहनांमधून अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल

Last Updated : Nov 20, 2023, 10:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.