ETV Bharat / state

Pune Crime News: ...'या' साठी आई-वडिलांनी मुलीला दोन हजाराला विकले... - येरवडा पोलीस

Pune Crime News : समाजात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यात एक धक्कादायक घटना (Pune Shocking Incident) घडली आहे. एका चार वर्षाच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी २ हजार रुपयांना विकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News
आई-वडिलांनी मुलीला विकले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 3:07 PM IST

पुणे Pune Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात मुलगा आणि मुलगी हा भेद अजूनही कमी होताना दिसत नाही. पुण्यात आई-वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनी मुलीला केवळ 2000 रुपयाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा मुली झाल्या म्हणून त्यातल्या एका मुलीला आई-वडिलांनी विकले. याप्रकरणी 15 जणांवर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीक मागण्यासाठी मुलीला विकले : पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीला अनिल जाधव, लक्ष्मी अनिल जाधव, मश्या ऊर्फ लक्ष्मण निंबाळकर या व्यक्तींना विक्री केली. तर यांनी मुलीला भीक मागून पैसे गोळा करण्यासाठी खरेदी केलं. आई-वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून आई-वडीलच वैरी झाले आहेत तर समाज अशा मुलीचे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसून येत आहे.

Father Sells Newborn Baby: दारूच्या नशेत बापाने पोटच्या कोवळ्या मुलीचा २० हजारांत केला सौदा..

15 आरोपींना केली अटक : शुभम शंकर लोखंडे यांनी फिर्याद दिली की, मुलीला खरेदी केल्यानंतर लक्ष्मी अनिल जाधव यांनी जातीतील पंचायतीसमोर नेण्यात आलं. त्यानंतर पंच लक्ष्मण भगवान निंबाळकर, अण्णा बाळू पवार, राम निंबाळकर, नारायण पवार, बाळू पवार, माऱ्या पवार, पांड्या पवार, शेट्टना पवार, अण्णा निंबाळकर, सोनिया पवार, ढेऱ्या पवार, यांच्या जातपंचायतीच्या सहमतीने या मुलीला भीक मागण्यासाठी पाठवून पैसे गोळा करत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी आईवडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस (Yerwada Police) करत आहेत.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कोयता गॅंगची दहशत कायम आहे. चोरीच्या आणि तोडफोडीच्या घटनांबरोबरच छोट्या मोठ्या गुंडांच्या टोळ्या देखील सक्रिय झाल्या आहेत. या सोबतच महिलांवरील अत्याचाराच्या घटना देखील वाढल्या आहेत.

हेही वाचा -

  1. धक्कादायक! 1 लाखासाठी आईनेच पोटच्या मुलीला विकले, महिला आयोगाने केली सुटका
  2. धक्कादायक : सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणुक; डॉक्टरने नवजात मुलीला विकले 7 लाखांत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.