पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये आयोजित कार्यक्रमात गायिकेने नाचता-नाचता तिरंगा ध्वज प्रेक्षकांमध्ये भिरकावला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी उमा शांती ही मुख्य गायिका व कार्यक्रमाचे आयोजक कार्तिक मोरे (रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा प्रकार कोरेगाव पार्क एनेक्समधील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडला. याबाबत पोलीस हवालदार तानाजी दादासाहेब देशमुख (वय ४५) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हॉटल फ्रेक सुपर क्लबमध्ये कार्तिक मोरे याने एरियल स्टोरी तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यात शांती पिपल म्युझिक बँडमधील गायिका उमा शांती हिने गाताना दोन्ही हातात तिरंगा ध्वज घेतला. तिरंगा अस्ताव्यस्त अवस्थेत फिरवून स्टेजसमोर नाचणाऱ्या प्रेक्षकांमध्ये भिरकाविला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
हर घर तिरंगा मोहिमेसोबत ध्वज संहितेत सुधारणा लागू- आपल्या देशात तिरंग्याचा म्हणजे राष्ट्रध्वजाचा मान राखला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येते. देशात ध्वजारोहणासाठी सरकारने अनेक नियम व तत्त्वे लागू केली आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने ध्वजारोहण करावे लागते. हर घर तिरंगा मोहिमेसोबतच, गृह मंत्रालयाने भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये सुधारणा केली आहे. राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनासाठी सर्व कायदे, अधिवेशने, पद्धती आणि सूचना एकत्र आणण्यासाठी भारतीय ध्वज संहिता लागू करण्यात आलेली आहे.
असा आहे आपला तिरंगा- स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रध्वज फडकवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपला ध्वज हे राष्ट्राभिमानाचे प्रतिक आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रतीकांपैकी एक आहे. देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा म्हणून ओळखला जातो. या राष्ट्रध्वजात केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आहेत. यात पांढर्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरे आहेत.
हेही वाचा-
- Independence Day 2023: राज्यातील 186 कैद्यांची आज कारागृहातून होणार सुटका..जबाबदार नागरिक होण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन
- India independence Day 2023 Updates: बापुंच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे-पंतप्रधान मोदी
- Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी आजवर कोणत्या मोठ्या घोषणा केल्या होत्या? वाचा सविस्तर