ETV Bharat / state

पुण्यात घरफोडी करणारे ३ जण जेरबंद, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त - रामटेकडी, हडपसर

पुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींकडून ४७ तोळे सोने, ४ किलो चांदी, एक कार, मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात घरफोडी करणारे ३ जण जेरबंद, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Aug 20, 2019, 8:33 AM IST

पुणे - शहरात घरफोडी करणाऱ्या ३ आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेकडी, हडपसर येथे सापळा रचून ही कारवाई केली.

पुण्यात घरफोडी करणारे ३ जण जेरबंद, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जितसिंग ऊर्फ जितु राजपालसिंग टाक (वय-23), हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय 28), अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय 34) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४७ तोळे सोने, ४ किलो चांदी, एक कार, मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचा साथीदार लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

लखनसिंग याच्या मदतीने पुणे शहरात गेल्या दीड वर्षापासून घरफोडीचे एकूण 27 गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपी वराहपालन व लोखंडी हत्यारे बनवण्याचा व्यवसाय करत असल्याचे वरकरणी दाखवत होते. मात्र, सर्वजण रात्रीच्यावेळी बंद असलेले फ्लॅट शोधून त्याचे कुलूप तोडत होते. त्याचवेळी शेजारील घराला बाहेरून कडी लावत होते. त्यानंतर घरात घुसून चोरी करीत होते. मुख्य आरोपी जितसिंगच्या विरोधात यापूर्वी एकूण ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:रामटेकडी, हडपसर येथे सापळा लावून गुन्हे शाखा युनिट तीनचे पथका घरफाेडी करणाऱ्या तीन गुन्हेगारांना जेरबंद ले आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण 47 ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने, चार किलाे वजनाचे चांदीचे दागीने, एक सॅन्ट्राे कार, एक माेटारसायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे दाेन कटावणी, एक बाेल्ट कटर, दाेन स्क्रु ड्रायव्हर असा एकूण 23 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Body:जितसिंग ऊर्फ जितु राजपालसिंग टाक (वय-23,रा.वैदवाडी,पुणे), हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (28,रा.रामटेकडी, पुणे) व अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (34,रा.हडपसर,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. त्यांचा साथीदार लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी हा पसार असून त्याचा पाेलीस तपास करत आहे. Conclusion:लखनसिंग याच्या मदतीने पुणे शहरात मागील दीड वर्षापासून घरफाेडी चाेऱ्या करत असलेले एकूण 27 गुन्हे उघडकीस आले आहे. रात्रीच्यावेळी बंद असलेले फ्लॅट शाेधून त्याचा कडी-काेयंडा उचकटून आराेपी घरात प्रवेश करत हाेते, त्याचवेळी शेजारील घराला बाहेरुन कडी लावत हाेते. आराेपी वरहापालन व लाेखंडी हत्यारे बनविण्याचा व्यवसाय वरकरणी असल्याचे दाखवत हाेते. मुख्य आराेपी जितसिंग याचे दहावी पर्यंत शिक्षण झाले असून त्याचे विराेधात यापूर्वीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.