ETV Bharat / state

पुण्यात रविवारी आढळले 1740 नवीन रुग्ण

पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Mar 14, 2021, 8:17 PM IST

पुणे - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. पुण्यातही दिवसागणिक सापडणाऱ्या कोरोनाग्रस्तांचा आलेखही चढताच आहे. पुण्यात शनिवारी तब्बल 1740 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 18 हजार 203 इतकी झाली आहे.

पुण्यात रविवारी 14 मार्च रोजी 858 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. एकूण 17 कोरोनाग्रस्तांचा पुण्यात शनिवारी मृत्यू झाला. सध्या पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये 11 हजार 590 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 355 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात आजपर्यंत एकूण 2 लाख 1661 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4952 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी एकूण 9122 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा - आता बोला.. रुग्णाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर निगेटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.