ETV Bharat / state

Action under Mokka : पुणे शहर पोलिस आयुक्तांची 112वी मोक्का अंतर्गत कारवाई; गुन्हेगारी सोडा आणि इतर व्यवसायाला लागा

author img

By

Published : Dec 8, 2022, 11:54 AM IST

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कारभार स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत या अडीच वर्षात तब्बल 112 मोक्का अंतर्गत कारवाई केल्या आहे. यात 600 हून अधिक आरोपींचा समावेश ( Including more than 600 accused ) आहे.

Action under Mokka
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच कारभार स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत या अडीच वर्षात तब्बल 112 मोक्का अंतर्गत कारवाई केल्या आहे. यात 600 हून अधिक आरोपींचा समावेश ( Including more than 600 accused ) आहे. राज्यातील अमिताभ गुप्ता हे पहिलेच असे अधिकारी आहे, ज्यांच्या कार्यकाळात एवढ्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्या आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

112 वी मोक्का अंतर्गत कारवाई : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्हेगार आणि टोळक्यांवर जबरदस्त कारवाईचा बडगा उभारला आहे. नुकतच मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील योगेश नागपुरे आणि टोळीतील सहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करत 112 वी कारवाई केली आहे.यामध्ये मुंढवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी योगेश नागपुरे यांच्यासह टोळीतील प्रमोद साळुंखे, वाजिद सय्यद, मंगेश तांबे, लक्ष्मण सिंह उर्फ हनुमंता तोवर आणि एका महिलेचा समावेश आहे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मुंढवा पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव सादर : या आरोपींनी संघटितपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर आतापर्यंत अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 च्या कलम 3(1) (ii),3 (2),3 (4) या कलमांचा अंतर्भाव करण्याकामी मुंढवा पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार पुढे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 112 वी कारवाई आहे.

अशी केली कारवाई : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, समाजामध्ये दहशत निर्माण करणारे, सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन 2022 या चालु वर्षातील 49 वी कारवाई केली आहे.यात तब्बल 800 गुन्हेगारांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये पुणे शहरातील कुख्यात टोळी मधील बंडु आंदेकर, महादेव अदलिंगे, निलेश घयवाळ, सचिन पोटे, बापु नायर, सुरज ठोंबरे, अक्रम पठाण यागुन्हेगांराचा समावेश आहे.

मोक्का म्हणजे काय : मोक्का म्हणजे 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा'. २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्रात 'टाडा' ऐवजी हा कायदा लागू करण्यात आला. महाराष्ट्रापुरताच तो मर्यादित असला तरी दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही संघटित गुन्हेगारी प्रकरणात हा कायदा लागू केला आहे.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध प्रस्थापित झाल्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. या कायद्यातील तरतुदीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षांत दोन गुन्ह्यांत आरोपपत्र सादर झालेले असणे बंधनकारक आहे. मोक्का' कायद्यातील २१ (३) या कलमानुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही. आरोपीविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता न आल्यास त्यानंतर जामीन मिळतो. परंतु बऱ्याचवेळा वर्षभरही आरोपींना जामीन मंजूर होत नाही.

शहरात या गुन्ह्यांमध्ये वाढ : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून 112 मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्या असल्या तरी या कारवाई शरिराविरुध्द, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, समाजामध्ये दहशत निर्माण करणारे, सराईत गुन्हेगार यांच्यावर करण्यात आल्या आहे. पण शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये सेक्सटॉर्षण,सायबर फसवणूक, तसेच नवीन टोळी म्हणजेच वय लहान असलेले गुन्हेगार, अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की सायबर गुन्हे दर दोन वर्षांनी त्यांचे रूप बदलत असतात. हे सगळ लक्ष विचलित करण्यासाठी असत. नागरिकांनी ऑनलाईन वापर करत असताना सावधानता बाळगणे खूप गरजेचे आहे. अस यावेळी गुप्ता म्हणाले. जे सध्या अल्पवयीन मुले तसेच नवीन टोळी शहरात येत आहे. त्यांना देखील पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी इशारा देत गुन्हेगारी सोडून इतर व्यवसायांवर लक्ष द्या. असा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.