ETV Bharat / state

पुणे शहरावर आता 2400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर - पुणे सीसीटीव्ही बातमी

पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप पाहता शहरात सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विस्तार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आणखी 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

pune city is now under cctv  surveillance
पुणे शहरावर आता 2400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
author img

By

Published : Jan 31, 2021, 3:21 PM IST

Updated : Jan 31, 2021, 4:38 PM IST

पुणे - कोणताही गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वाधिक मदत होते, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची. पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप पाहता शहरात सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विस्तार केला जात आहे. सद्यस्थितीत पुणे शहरातील प्रमुख चौकात 1000 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता कॅमेर्‍यांचीही संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आणखी 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येईल -

सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची नजर असणारे पुणे शहर हे राज्यातील पहिले शहर ठरले होते. 2014 खाली शहरात हजारहून अधिक कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु शहराचा वाढता विस्तार पाहता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही संख्या अपुरी पडत होती. पुणे पोलीस आयुक्तालयात आता नव्याने 6 पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार आहे. हे सर्व पाहता आता शहरातील प्रत्येक चौकात गल्लीत आणि रस्त्यावर सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. शहरात नव्याने चौदाशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

खासगी कॅमेराचे जिओ टॅगिंग -

शहरात असणाऱ्या 47 हजार 406 खासगी कॅमेराचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना कोणत्या रस्त्यावर किती कॅमेरे आहेत याची अचूक माहिती पोलिसांना मिळते. त्यामुळे गुन्हेगारांपर्यंत कमी वेळेत पोहोचणे शक्य होते. या खाजगी सीसीटीव्हीचा वापर गरज असेल तर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आतापर्यंत 209 गुन्हे उघडकीस आले आहे. याद्वारे 172 आरोपींना अटकही करण्यात आली. तर पाच कोटी 74 लाख 86 हजारांचा मुद्देमाल ही या कॅमेऱ्यांचा वापर करून हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय या खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून 26 मोबाईल फोन, 13 दुचाकी, चार रिक्षा, एक टेम्पो, दहा कार, दोन ट्रक असा मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! विहिरीत पडलेल्या कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह; मृत व्यक्ती २०१९ मध्ये बेपत्ता?

Last Updated : Jan 31, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.