ETV Bharat / state

खडकवासला धरणात कार कोसळून दोन मुलींसह आईचा बुडून मृत्यू - पुणे खडकवासला कार

कारमध्ये एकाच कुटूंबातील चार जण होते. रस्त्यावरील एका वळणावरून जात असताना ही कार धरण पात्रात पडली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाला याची माहिती दिली. तोपर्यंत कार चालवणारा व्यक्ती पोहत बाहेर आला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य राबवून यातील तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले.

पुणे कार अपघात
पुणे कार अपघात
author img

By

Published : Apr 2, 2021, 8:22 PM IST

पुणे - शहराजवळ असलेल्या खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सँट्रो कार कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये दोन मुली आणि आईचा समावेश आहे. तर वडील पोहत बाहेर आल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण परिसरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, 2 एप्रिल (शुक्रवार) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पानशेत रस्त्यावरून ही कार जात होती. या कारमध्ये एकाच कुटूंबातील चार जण होते. रस्त्यावरील एका वळणावरून जात असताना ही कार धरण पात्रात पडली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाला याची माहिती दिली. तोपर्यंत कार चालवणारा व्यक्ती पोहत बाहेर आला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य राबवून यातील तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने हे शोधकार्य राबवले आहे.

हेही वाचा-दाऊदचा साथीदार दानिश चिकना अटकेत

हेही वाचा-अमरावतीत 366 किलो अवैध गांजा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.