ETV Bharat / state

अभिमानास्पद! पाच मिनिटे ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम - World record of hymn recitation

पुण्यातील संस्कार ऋषिकेश खटावकर याने अवघ्या पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम केला. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book of Records ) व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ( World Book of Records ) लंडनमध्ये घेण्यात आली आहे.

Sanskar Rishikesh Khatavkar world record
संस्कार ऋषिकेश खटावकर
author img

By

Published : Nov 11, 2022, 8:49 AM IST

Updated : Nov 11, 2022, 12:14 PM IST

पुणे : अवघ्या पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम पुण्यातील संस्कार ऋषिकेश खटावकर याने केला ( Sanskar Rishikesh Khatavkar world record ) आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या या कामगिरीची नोंद झाली ( World record of hymn recitation ) आहे.

संस्कार ऋषिकेश खटावकर

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : शिवाजीनगर येथील मॉडर्न प्री-प्रायमरी स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या संस्कारने नुकतीच ही विक्रमी कामगिरी केली. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book of Records ) व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ( World Book of Records ) लंडनमध्ये घेण्यात आली आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् तीन मिनिटे सात सेकंदात पठण करीत त्याने केरळच्या मुलीचा तीन मिनिटे ४४ सेकंदाचा विक्रम मोडला.

स्तोत्र बोलण्यास कठीण : महिषासुरमर्दिनी स्तोत्रम आणि शिवतांडव स्तोत्र बोलण्यास कठीण ( Shiv Tandav Mahishasurmardini Stotra Recitation ) आहेत. मात्र, आम्ही गेली तीन वर्षे तयारी करत होतो. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे आम्हाला अधिक वेळ मिळाला. आम्ही सुरवातीला त्याला पठणबाबत तयारी करायला सांगितली आणि त्याने त्यांनतर हे पठण पाठांतर केले . कोरोना काळात त्याने शाळेला सुट्टी असताना पूर्ण तयारी केली .अशी माहिती यावी त्याची आई मोनिका ऋषिकेश खटावकर यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव : संस्कारने केलेल्या कामगिरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा गौरव केला. मंत्रालयात झालेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी संस्कारचा सत्कार करत त्याच्या विक्रमाचे कौतुक केले. प्रसंगी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह संस्कारचे वडील ऋषिकेश खटावकर आदी उपस्थित होते.

Last Updated : Nov 11, 2022, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.