ETV Bharat / state

पुण्यात अनोखे रक्तदान शिबिर : मांसाहारी रक्तदात्याला 1 किलो चिकन आणि शाकाहारीला अर्धा किलो पनीर - pune ncp blood donation camp

कोथरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शंकर केमसे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला एक किलो चिकन आणि अर्धा किलो पनीर देण्यात आले.

pune blood camp non veg and vegetarian doner get  chicken and paneer
पुण्यात अनोखे रक्तदान शिबिर
author img

By

Published : Dec 20, 2020, 6:19 PM IST

Updated : Dec 22, 2020, 4:47 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा आहे. राज्य सरकारच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. पुण्यातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, आज (रविवारी) आयोजित करण्यात आलेल्या एका रक्तदान शिबिराची जास्तच चर्चा होत आहे. या शिबिरात मांसाहारी रक्तदात्याला एक किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्याला अर्धा किलो पनीर देण्यात आले. यामुळे याच रक्तदान शिबिरात रक्तदात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने साधलेला संवाद

रक्तदान शिबिरात 300 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप -

कोथरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बंडू केमसे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला एक किलो चिकन आणि अर्धा किलो पनीर देण्यात आले. दुपारपर्यंत रक्तदान शिबिरात 300 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप रक्तदात्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक शंकर केमसे यांनी दिली.

हेही वाचा - 'मुंबई महापालिकेच्या सर्व 227 जागा लढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न'

350 हुन रक्त पिशव्यांचे संकलन -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये साडेतीनशेहून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. रक्तदान केल्यानंतर मांसाहारी रक्तदात्यांना एक किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्यांना अर्धा किलो पनीर देण्यात येत असल्याने या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी गर्दी केली होती.

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या आदेशाने रक्तदान शिबिर -

कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुडवडा लक्षात घेत राज्यतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, म्हणून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, अशी माहितीही यावेळी शंकर केमसे यांनी दिली.

Last Updated : Dec 22, 2020, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.