ETV Bharat / state

Nira Deoghar Dam:  धरणात कार कोसळल्यानंतर बेपत्ता तरुणाचा सलग दुसऱ्या दिवशी शोध सुरू, तिघांचा मृत्यू

पुण्याहून भोर महाड मर्गावरील वरंधा घाटातील वारवंड शिरगाव हद्दीत कार नीरा देवघर धरणात कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील एकजण बेपत्ता आहे. तर या अपघातात एकजण बचावलेला आहे.

Nira Deoghar Dam
नीरा देवघर धरणात कार कोसळली
author img

By

Published : Jul 30, 2023, 1:00 PM IST

Updated : Jul 30, 2023, 1:11 PM IST

नीरा देवघर धरणात कार कोसळली

पुणे : पुण्याहून वरंधा घाटमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला. कार चालकाचा वारवंड हद्दीतील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने शनिवारी सकाळी आठच्या सुमारास गाडी 200 फूट दरीत कोसळून धरणाच्या पाण्यात पडली. गाडीतील चालक अक्षय रमेश धाडे (वय 27 रा. रावेत, पुणे) याचा मृतदेह‌ पाण्यातील गाडीत, तर हर्षप्रीत हरप्रीत बांबा (महिला वय 30 रा.पाषाण पुणे मुळ रा. गोरखपूर मध्यप्रदेश) यांचा मृतदेह पाण्यात धरणाच्या काठावर आढळून आला. स्वप्निल शिंदे वय (27 रा. हडपसर, पुणे) याचा तपास लागला अजून लागला नाही. त्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

कार दरीत कोसळली : अपघातात बचावलेला संकेत विरेश जोशी (वय 28 रा. गुजरात) हा जखमी झाला आहे. अपघात झाल्यावर जखमी संकेत हा रस्त्यावर आला. त्याने शिरगाव येथील ग्रामस्थ शेती कामासाठी जात असलेल्या वाहनाला थांबवून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. कार दरीत कोसळताना कारचा दरवाजा उघडल्याने संकेत कारमधून बाहेर पडला. त्यामुळे तो बचावला असल्याची माहिती समोर आली आहे.

बंदी असताना वरंधा घाटात प्रवास करताना आढळल्यास वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे- भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे

तातडीने बचावकार्य : अपघाताची घटना कळताच भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक रेखा वाणीसह भोर पोलीस घटनास्थळी पोहचून बचाव कार्यात सहभागी झाले. या बचावकार्यात भोईराज जल आपत्तीचे जवान आणि सह्याद्री रेस्कू व सर्चच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. तसेच शिरगाव, हिर्डोशी, कोंढरी येथील तरुणांनी मदत केली. मृतदेह भोर येथे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. भोईराज जल आपत्तीचे जवान बेपत्ता तरुणाचा शोध घेत आहेत.

धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे नाही : अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने हा अपघात झाला, अशी तेथे जमलेल्या नागरिकांमध्ये चर्चा होती. घाटात अनेक धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे यापुढेही असे अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. घाटात संरक्षक बसवावेत, अशी मागणी आता स्थानिकांकडून होत आहे. दरडी कोसळण्याची भीती असल्याने हा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद तर 30 सप्टेंबर पर्यंत जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वरंधा घाटातून वाहतूक बंदी असतानाही ही कार घाटात कशी गेली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रशासनानेही आता कडक पाऊले उचलली आहेत.

हेही वाचा :

  1. landslide in Uttarkashi : गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली, रस्त्यावरुन जाणारा टेम्पो उलटला
  2. Pune Car Accident : निरा देवघर धरणात कार कोसळून तिघांचा मृत्यू, वरंध घाटातील शॉर्टकट प्रवास ठरला जीवघेणा
  3. Rewa Road Accident : मध्य प्रदेशात अनियंत्रित कार 20 फूट दरीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

Last Updated : Jul 30, 2023, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.