ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्णांना  तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात - उपमुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री अजित पवार बातमी

कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळायला हव्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. बारामती येथील बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. तसेच बारामती तालुक्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली.

baramati
baramati
author img

By

Published : Aug 16, 2020, 5:51 PM IST

बारामती (पुणे) - शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांना कोणताही विलंब न होता तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (16 ऑगस्ट) दिले.

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाबाबतची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग, पुणे) संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषद पुणे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून आणि समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सुविधा तात्काळ आणि दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा मिळण्यास रुग्णांना त्रास होऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव कालावधीमध्ये जे काही सण, उत्सव येतील ते साधेपणाने आणि गर्दी न करता साजरे करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.