बारामती- बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू असणारी ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी भविष्यात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. येथील केंद्रात शेती उपयुक्त सुरू असणारे विविध उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगून येथील कामकाजाचे कौतुक महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव, एकनाथ डवले यांनी केले.
या वेळी बारामती येथील ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राला आज डवले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कृषी केंद्राची प्रशंसा केली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोटे याप्रसंगी उपस्थित होते.
उपक्रमांची घेतली माहिती -
110 एकर क्षेत्रात विस्तारलेल्या कृषी तंत्रज्ञानाची माहिती एकनाथ डवले यांनी घेतली. येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची व निर्यातक्षम भाजी पाल्याची माहिती जाणून घेतली. कृषी विज्ञान केंद्रास भेटीसाठी आलेले एकनाथ डवले, धीरज कुमार व त्यांच्यासमवेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा निलेश नलावडे यांनी केले. विषय विशेषज्ञ संतोष करंजे, केंद्राचे प्रमुख डॉ.आर.एस.जाधव, यशवंत जगदाळे व तुषार जाधव यांनी मान्यवरांना कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली