बारामती - इंदापूर तालुक्यातील सराफवाडीत राहणाऱ्या धनवडे पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिल्याने इंदापुरात या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नकार्यासह मोदींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे धनवडे कुटुंबात दुहेरी आनंदाचे वातावरण आहे.
इंदापूर येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील नानासाहेब धनवडे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मुलाच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला उत्तर देताना मोदींनी धनवडे पाटील परिवाराचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त करून वधूवरांना शुभेच्छा पत्रात आशीर्वाद दिले आहेत.
अशा दिल्या मोदींना शुभेच्छा -
नरेंद्र मोदी यांना धनवडे पाटील यांच्याकडून दीपक आणि वैभवी यांच्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. तुमच्या कुटुंबियांच्या आनंदाच्या क्षणी मला बोलवले याबद्दल धन्यवाद. नवजीवनाच्या वधू वरास मनापासून शुभेच्छा. हा विवाह तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी तसेच विश्वास आणि मैत्रीचा धागा दोघांना सदैव बांधून ठेवेल. तुमच्या नात्यात स्नेह राहील. जीवनाच्या प्रवासात हे नाते अधिक घट्ट आणि मजबूत हवे. सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. या आशयाचे पत्र मोदींनी धनवडे पाटील यांना लिहिले आहे. या पत्रामुळे धनवडे पाटील परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे.