ETV Bharat / state

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण - Pune Teachers Constituency Election Updates

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बारामतीत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बारामतीत १ हजार १५३ शिक्षक मतदार असून, त्यात ३३५ महिला व ८१८ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

Pune Graduate Election Update
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण
author img

By

Published : Nov 30, 2020, 7:07 PM IST

बारामती- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बारामतीत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बारामतीत १ हजार १५३ शिक्षक मतदार असून, त्यात ३३५ महिला व ८१८ पुरुष मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.

तर पदवीधर मतदार संघासाठी बारामतीत ८ हजार १५८ मतदार असून, यात ५ हजार ६७५ पुरुष तर २ हजार ४८३ महिला मतदारांचा समावेश आहे. पदवीधरांसाठी १४ तर शिक्षक मतदारांसाठी ६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. १२८ अधिकारी व कर्मचारी या मतदान केंद्रावर कार्यरत असणार आहेत. ही निवडणूक योग्यरीत्या पार पाडावी म्हणून ९ भरारी पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व सिल्वर जुबिलीचे अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांची आरोग्य सुरक्षिततेसाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. शहरी भागासाठी ३ तर तालुक्यासाठी ५ वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. २० केंद्रावरील मतदान प्रक्रिया वेब कास्टिंगद्वारे पाहता येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.