ETV Bharat / state

कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त

नवल किशोर राम यांनी शनिवारी पेरणे येथील जयस्तंभ व वढू येथे भेट दिली. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली.

preparation-of-administration-for-koregaon-bhima-shaurya-din
भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज
author img

By

Published : Dec 30, 2019, 9:55 AM IST

पुणे- जिल्ह्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भीमा) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज

हेही वाचा- CAA Protest: दिल्लीतील शाहीन बाग परिसरात 'जेल भरो' आंदोलनाला सुरुवात

नवल किशोर राम यांनी शनिवारी पेरणे येथील जयस्तंभ व वढू येथे भेट दिली. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.

नागरिकांसाठी विविध सुविधा
जयस्तंभ परिसरात चार हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. याशिवाय जयस्तंभ परिसरात कायमस्वरुपी पथदिवे बसविण्यात येत आहेत. मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येत आहे. 100 टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 500 फिरते स्वच्छतागृह असणार आहेत. 12 ओपीडी सेंटर्स, 20 रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्यावतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.15 ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभाग याठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्यासाठी कार्यरत आहेत.

दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
400 पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 10 हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ, होमगार्ड व स्वयंसेवक कार्यरत असतील. 'ट्रॅफिक जॅम'ची समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

नागरिकांसाठी 260 बसेसची व्यवस्था
जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 31 डिसेंबर व 1 जानेवारीला एकूण 260 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासून जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतूक या बसेस करतील.

अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई
पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले की, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या भावनांचा आदर राखून शांतता राखावी. प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांच्या वाहनांसाठी या परिसरापासून जवळच विविध ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 150 एकर जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शांततेने पार पाडण्यासाठी बाहेरून येणारे व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये. यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मीडियाव्दारे प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या तसेच खोट्या अफवा व चुकीच्या पोस्ट प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Intro:

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज, दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. नवल किशोर राम यांनी शनिवारी पेरणे येथील जयस्तंभ व वढू येथे भेट देवून अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या सोबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.

नागरिकांसाठी विविध सुविधा

*जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. याशिवाय जयस्तंभ परिसरात कायमस्वरुपी पथदिवे बसविण्यात येत आहेत.

* मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येत आहे.

* 100 टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

* 500 फिरते स्वच्छतागृह असणार आहेत.

* 12 ओपीडी सेंटर्स, 20 रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे.

* बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

* 15 ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे.

* याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभाग याठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्यासाठी कार्यरत आहेत.

Body:दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

*400 पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 10 हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ, होमगार्ड व स्वयंसेवक कार्यरत असतील.

* 'ट्रॅफिक जॅम' ची समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.

नागरिकांसाठी 260 बसेसची व्यवस्था-

जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.31 डिसेंबर 2019 व 1 जानेवारी 2020 रोजी एकूण 260 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक या बसेस करतील.

Conclusion:अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई

पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या भावनांचा आदर राखून शांतता राखावी व प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांच्या वाहनांसाठी या परिसरापासून जवळच विविध ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 150 एक जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शांततेने पार पाडण्यासाठी बाहेरुन येणारे व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मिडियाव्दारे प्रक्षोभक वक्तव्य करणा-या तसेच खोटया अफवा व चुकीच्या पोस्ट प्रसारित करणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.