ETV Bharat / state

Pune Accident: बाळंतपणाचे स्वप्न राहील अपूर्ण; गरोदर महिलेच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने जागेवर मृत्यू - अशी घडली घटनाट

Pune Accident: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात असणाऱ्या वारुळवाडी येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. उसाच्या ट्रॉली खाली सापडून एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune Accident
Pune Accident
author img

By

Published : Nov 15, 2022, 1:36 PM IST

पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात असणाऱ्या वारुळवाडी येथून एक धक्कादायक घडली आहे. उसाच्या ट्रॉली खाली सापडून एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्या रमेश कानसकर (वय २२) असे या महिलेचे नाव आहे.

गरोदर महिलेच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने जागेवर मृत्यू

अशी घडली घटना: विद्या कानसकर या जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील असून आपल्या पती व आईसोबत नारायणगाव येथे उपचारासाठी आले होते. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे. रस्त्यात गतिरोधक आला, म्हणून विद्या या गाडीवरून खाली उतरल्या. मात्र समोर येणाऱ्या 2 जोडणाऱ्या ट्रॉली भरून ट्रॅक्टरचा ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला. त्याने विद्यांही खाली रस्त्यावर पडली. त्यावेळी तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. त्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखला केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.

या घटनेची तक्रार: 2 ट्रॉली एक मेकाला जोडलेल्या असल्याने मागच्या ट्रॉली खाकी सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने जन्माला येण्यापूर्वीच बाळाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेने नागरिक संतप्त झाले होते. या घटनेची तक्रार मृत महिलेचे पती रमेश कानसकर यांनी दिली आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोरक्ष सुखदेव ढेबरे असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

या परिसरात अशीच घटना: गेल्या अनेक वर्षांपासून नारायणगाव येथील बसस्टँड समोर असलेल्या चौकात अपघात होण्याचे प्रमाण हे वाढले आहे. प्रशासन वारंवार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच संध्याकाळच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्या गेल्या नाहीत त्यामुळे रस्त्याला असणाऱ्या कडांवर दुचाकी घसरून, असे अपघात होत आहेत. 6 महिन्यापूर्वी देखील या परिसरात अशीच घटना घडली होती. त्यामुळे अजून किती जीव जाणार असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.