पुणे - शहर आणि परिसरात मंगळवारी दुपार नंतर अनेक भागात चांगला पाऊस झाला. शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारनंतर शहराच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर धायरी, वडगाव, नऱ्हे, सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पाऊस झाला.
कोथरूड, शिवाजी नगर, पेठांचा परिसर कात्रज अशा शहराच्या जवळपास सर्वच भागात पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात होत असलेला हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे. अद्याप महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्री वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे शहर आणि परिसरात येत्या दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी पुणे शहर आणि परिसरात पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि परिसरात पावसाचा अंदाज आहे. काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने शहराच्या सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे.
पुणे शहर-परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी - मान्सूनपूर्व पाऊस पुणे लेतेस्ट बातमी
कोथरूड, शिवाजी नगर, पेठांचा परिसर कात्रज अशा शहराच्या जवळपास सर्वच भागात पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात होत असलेला हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे.