पुणे - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी वैशाखखेडे येथे गेल्या अनेक वर्षांपासून पद्मावती देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही पूजा संपन्न होते.
वरूणराजाच्या कृपेने जोरदार पाऊस व्हावा. बळीराजाच्या शेतात भरपूर प्रमाणात पीक यावे, त्यातून चांगले उत्पन्न मिळून बळीराजाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी गावकरी गावच्या जवळच असलेल्या पद्मावती मंदिराजवळ एकत्रित येतात. या ठिकाणी ते पद्मावती देवीसह गंगा पूजन करतात.
अनेक वर्षांची ही परंपरा गावकरी आजही तितक्याच उत्साहात जोपासतात. यावर्षीदेखील गावकऱ्यांनी पद्मावती देवीसह, कुकडी नदीची पूजा केली आणि कुकडी मातेला चोळी-पातळ अर्पण केले.