ETV Bharat / state

पुणे : फसवणूक प्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी - प्रणव मराठे यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

प्रणव मराठे यांना पोलिसांनी तपासासाठी वारंवार हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. परंतु तरीही ते पोलिसांसमोर हजर न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती.

pune marathe jwellers owner arrest
पुणे : फसवणूक प्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
author img

By

Published : Aug 13, 2021, 3:23 PM IST

पुणे - प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून 18 गुंतवणूकदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी शुभांगी विष्णू काटे (59) यांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. प्रणव मराठे यांना पोलिसांनी तपासासाठी वारंवार हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. परंतु तरीही ते पोलिसांसमोर हजर न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता विशेष न्यायालयाने त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रणव मराठे यांच्यासह कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे आणि आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण -

ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने चांदी यांची गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवल्यामुळे 18 गुंतवणूकदारांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली होती. 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या दरम्यान हा प्रकार घडला. गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम आरोपीने वैयक्तिक फायद्यासाठी वापरले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, प्रणव मराठे यांना कोथरूड पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनेक वेळा नोटीस पाठवल्या. परंतु ते हजर राहिले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

हेही वाचा - एका फ्लॅट मालकाला एकापेक्षा जास्त वाहने पार्किंगची परवानगी देऊ नये - मुंबई उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.