ETV Bharat / state

मुद्रा योजनेचा पुणे जिल्ह्यातील 9 लाख युवकांना लाभ - प्रकाश जावडेकर - माहिती व प्रसारण मंत्रालय

जावडेकर यांनी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा प्रदेशामार्फत केंद्र शासनाच्या योजनांचे फिरते प्रदर्शन तसेच पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या जलदूत बसला हिरवा झेंडा दाखवला.

प्रकाश जावडेकर
author img

By

Published : Sep 15, 2019, 2:47 AM IST

पुणे - केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती सभा (दिशा) चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पुणे जिल्ह्यामध्ये मुद्रा योजनेतून 145 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येवून जवळपास 9 लाख युवकांना याचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी जावडेकर यांनी दिली. याबाबतचा आढावा घेऊन जास्तीत जास्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे व त्यावेळी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, या योजनेची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबधितांना वेळोवेळी पाठवावा, अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या नवीन सोई सुविधांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी पुणे विभागामध्ये 5 नवीन स्वयंचलीत जिन्यांची उभारणी, एकूण 46 स्टेशनवर देण्यात आलेल्या वाय-फायची सुविधा तसेच नव्याने करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

प्रकाश जावडेकर

पासपोर्ट कार्यालये, पोस्ट आणि दूरसंचार विभागांचा आढावा घेवून प्रलंबित कामांबाबत कार्यवाही करण्यात येवून पुढील बैठकीमध्ये माहिती देण्याची सूचना जावडेकरांनी केली. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आरोग्य वर्धीनी केंद्रे, शिक्षण विभागाकडील समग्र शिक्षांतर्गत ग्रंथालये व शालेय साहित्य वाटप इत्यादींचा आढावा घेतला.

स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना इत्यादी योजनांचा आढावा घेवून आवश्यक सूचना करण्यात आल्या. या बैठकीपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा प्रदेशामार्फत केंद्र शासनाच्या योजनांचे फिरते प्रदर्शन तसेच पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या जलदूत बसला हिरवा झेंडा दाखवला. राज्याच्या 8 जिल्ह्यांमधून या जलदूत बसमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांना पाण्याचे संवर्धन बचत, स्वच्छतेचे पालन व प्लास्टीक वापर न करण्याबाबत शपथही देण्यात आली.

Intro:पुणे जिल्हयामध्ये मुद्रा योजनेमधून 145 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येवून जवळपास 9 लाख युवकांना याचा लाभ मिळाला,प्रकाश जावडेकरBody:mh_pun_08_prakash_javdekar_pune_av_7201348

anchor

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या आहेत.पुणे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती सभा (दिशा) चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हयामध्ये मुद्रा योजनेमधून 145 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येवून जवळपास 9 लाख युवकांना याचा लाभ मिळाला आहे याबाबतचा आढावा घेवून जास्तीत जास्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे व त्यावेळी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, या योजनेची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबधितांना वेळोवेळी पाठवावा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या. रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या नवीन सोई सुविधांची माहिती घेतली. यावेळी पुणे विभागामध्ये 5 नवीन स्वयंचलीत जिन्यांची उभारणी करण्यात आली आहे, एकूण 46 स्टेशनवर देण्यात आलेल्या वाय-फायची सुविधा तसेच नव्याने करण्यात येणा-या कामांचा आढावा त्यांनी घेतला, यावेळी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पासपोर्ट कार्यालये, पोस्ट आणि दूरसंचार विभागांचा आढावा घेवून प्रलंबित कामांबाबत कार्यवाही करण्यात येवून पुढील बैठकीमध्ये माहिती देण्याची सूचना केली. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणा-या राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आरोग्य वर्धीनी केंद्रे, शिक्षण विभागाकडील समग्र शिक्षांतर्गत ग्रंथालये व शालेय साहित्य वाटप इ.चा आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना इ.योजनांचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. या बैठकीपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा प्रदेश मार्फत केंद्र शासनाच्या योजनांचे फिरते प्रदर्शनाचे तसेच पाणी बचतीचा संदेश देणा-या जलदूत बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. राज्याच्या 8 जिल्ह्यांमधून या जलदूत बसमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उपस्थितांना पाण्याचे संवर्धन बचत, स्वच्छतेचे पालन व प्लास्टीक वापर न करण्याबाबत शपथ देण्यात आली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.