ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांना कणा नाही, त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत - प्रकाश आंबेडकर

आघाडी सरकारमधीलच काही मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी सांगितले होते, ही सत्य परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या होत्या का ? मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती का ? असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 28, 2021, 4:17 PM IST

पुणे - उद्धव ठाकरे हे यापूर्वीचे सरकार असतानाही सत्तेत होते. त्यांना सरकारमधील गोष्टी माहित नाही असे होणार नाही. उद्धव ठाकरे यांना कणा नाही, त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच महाविकासआघाडीचे सरकार हे गुन्हेगारी वृत्तीचे आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवीन सरकार आलं पाहिजे असं खरमरीत शब्दात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडले. पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनया ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

माझेही फोन टॅप होतात
फोन टॅपिंग प्रकरणावर ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी भाष्य केले. माझेही फोन टॅप होत आहे. आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मात्र, मी कुणाकडे पैसे मागत नाही त्यामुळे मला कसलीच भीती वाटत नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

पश्‍चिम बंगालच्या पोलिसांनी मोदींवर गुन्हा दाखल करावा
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी स्वतः नियमांचे उल्लंघन करत आहे. मात्र त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. पश्चिम बंगालच्या पोलिसांनी नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करून दाखवावा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नरेंद्र मोदी जितक्या वेळा पश्चिम बंगालमध्ये जातील ममता बॅनर्जी यांच्या जागांमध्ये तितकीच भर पडेल, असे भाकीतही आंबेडकर यांनी यावेळी वर्तवले.

हेही वाचा- एनआयए पथक एटीएसच्या कार्यालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.