पिंपरी-चिंचवड- कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा स्टेन अधिक धोकादायक असल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. त्यादृष्टीने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनामुक्त होऊन आल्यानंतरही अनेक व्यक्तींना पोष्ट कोविडच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा देखील शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोष्ट कोविडमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे याची सखोल माहिती डॉ. प्रितम राजेश लांडगे यांनी दिली आहे.
पोस्ट कोविड म्हणजे काय? काळजी घेण्यासाठी तेलकट पदार्थ खाणे टाळा!
कोरोनामुक्त झाल्यानंतर अशक्तपणा येतो. याचे कारण म्हणजे शरीरात असलेल्या कोरोना विषाणूच्या इन्फेक्शन यामुळे रुग्ण म्हणावे तस जेवन करत नाही. त्यामुळे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे हाय प्रोटीन डायट घेणे, जमेल तेवढा व्यायाम, योगासने, प्राणायाम, फिजिओथेरपीचे व्यायाम करणे हे शरीराला आराम देऊ शकतात.