पुणे: वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांनी अनेक आजारांवर यशस्वीपणे मात केल्यामुळे आज आयुष मंत्रालयाची लोकप्रियता, विश्वासार्हता आणि स्वीकार्यता जागतिक पातळीवर वाढली आहे, असे आज केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल Sarbananda Sonowal यांनी सांगितले आहे. त्यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
सोनोवाल यांची माहिती परंपरागत चिकित्सा पद्धतीला लोकांनी जोडलेले राहणे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहणे हा 'हर दिन हर घर आयुर्वेद' या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. निसर्गात जी संपदा, आणि शक्ती आहे. त्याची माहिती लोकांना व्हावी, हेही त्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली आहे. ही 5 हजार वर्षे जुनी आरोग्य पद्धत असून आज आयुष क्षेत्राने जी मानवसेवा केली आहे. त्याला तोड नाही असे ते म्हणाले. 2014 पर्यंत आयुष क्षेत्राची बाजारपेठ फक्त 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मर्यादित आकाराची होती.
2047 पर्यंत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने आणि निष्ठापूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्यांनी त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे आज हा उद्योग जगभरात 18 अब्ज 2 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. आयुष मंत्रालयाची अन्न उत्पादने असतील किंवा औषधे, लोकांना त्यामार्फत दिलासा मिळाला आहे, आणि त्यांचा विश्वास वाढला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. या मंत्रालयाशी संबंधित सर्व घटकांनी एका कुटुंबासारखे काम करत 2047 पर्यंत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जायचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.