पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, परंतु याचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ज्या प्रकारे अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात राजकारण करण्यात आले, तसेच या प्रकरणात होऊ नये, त्या मुलीला न्याय मिळायला हवा. या प्रकरणात जर कोणी दोषी असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हावी, असेही रोहित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांबरोबर व्हॅलेंटाईन-डे साजरा -
आजचा दिवस हा प्रेमाचा आहे. एकच दिवस नव्हे, तर वर्षभर शेतकऱ्यांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज देशात जे घडत आहे. ते अत्यंत दुर्देवी आहे. नवीन कृषी कायदे आणून त्यांचा हक्क मारला जात आहे. लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहील पाहिजे. आज प्रेमाचा दिवस आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांबरोबर साजरा करावा म्हणून मी आज येथे शेतकऱ्यांबरोबर व्हॅलेंटाईन-डे साजरा करण्यासाठी आलो आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा - 72 तासांत त्याच ठिकाणी पुन्हा अपघात, चारचाकी विहिरीत पडून दोघांना जलसमाधी