ETV Bharat / state

पुण्यात अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान पोलिसांची वृद्ध महिलेस मारहाण, व्हिडिओ व्हायरल - hadaspar railway bridge

मुंढवा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला. यात पोलिसांनी एका चहा विक्रेत्या महिलेस मारहाण केली आहे.

महिलेला मारहान केल्याचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2019, 9:08 AM IST

Updated : Jul 11, 2019, 9:59 AM IST

पुणे- मुंढवा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेला मारहाण केल्याचे दृष्य

पुण्यातील हडपसर परिसरातील रेल्वे ब्रिज ते भीमनगर रस्त्यावर विक्रेत्यांनी अनधिकृतपणे आपली दुकाने मांडली होती. या अनधिकृतपणे बसलेल्या विक्रेत्यांवर अतिक्रमण विभाग व पोलीस कारवाई करीत होते. कारवाई दरम्यान अनेक अनधिकृत विक्रेत्यांना पोलिसांनी भर रस्त्यात, गर्दीसमोर मारहाण केली. तसेच भीमनगर परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या वृद्ध महिलेलाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांद्वारे केलेल्या या अमानूष वागणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Intro:पुण्यातील मुंढवा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध महिला आणि इतरांना भर रस्त्यात मारहाण केली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Body:पुण्यातील हडपसर परिसरातील रेल्वे ब्रिज ते भीमनगर रस्त्यावर अनधिकृतपणे बसलेल्या विक्रेत्यांवर अतिक्रमण विभाग व पोलीस कारवाई करीत होते. यावेळी अनेक अनधिकृत विक्रेत्यांना पोलिसांनी भर रस्त्यात, गर्दीसमोर मारहाण केल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. भीमनगर परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या वृद्ध महिलेला महिला पोलिसांनी मारहाण केल्याचाही एक व्हिडिओ आहे.
Conclusion:.
Last Updated : Jul 11, 2019, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.