ETV Bharat / state

Pune Crime News: 'त्या' दोन सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांकडून ड्रोनचे साहित्य जप्त; संवेदनशील ठिकाणी स्फोट करण्याचा होता डाव

राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेलता सुफा या आतंकवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी पकडले आहे. आत्ता या दोघांकडे होत असलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांचे ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण करण्याच्या तयारीत हे दहशतवादी असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. तर त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळून आले आहे.

Pune Crime News
संवेदनशील ठिकाणांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण
author img

By

Published : Jul 23, 2023, 12:59 PM IST

Updated : Jul 23, 2023, 2:22 PM IST

पुणे : कोथरुड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत असलेल्या मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) हे अटकेत आहेत. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) हा पसार झाला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. शहरात घातपाताची कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍यांचे साहित्य जप्त केले आहे. तर पुण्यात या दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी घरे भाड्याने घेतले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही दोन्ही घरे कोंढवा परिसरातील असून दुसर्‍या घरातून पोलिसांनी आणखी एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. या दोन्ही दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.

'असा' मुद्देमाल जप्त : कोथरूड परिसरातून हे तिघे दुचाकी चोरीच्या तयारीत असताना त्यांना पकडण्यात आले. त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत आहे. इम्रान खान, युनूस साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढर्‍या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह महत्वाच्या लष्करी, तसेच संशोधन संस्था आहे. हे तिघे पुणे शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या तयारीत असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

पुण्यातील कोंढवा भागात वास्तव्य : खान आणि साकी यांच्याकडून पांढर्‍या रंगाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गोळ्या न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हे तिन्ही दहशतवादी पुण्यातील कोंढवा भागात वास्तव्यास होते. घरमालकाने त्यांच्या भाडेकराराची नोंदणी केली नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. साकी आणि खान आयएसआयएस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित आहे. ते जयपूर येथे बाँबस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते.

पुण्यात घातपाती कारवाया : साकी आणि खान हे दोघे एनआयएच्या रेकॉर्डवरील पाच लाखांचे बक्षीस असलेले दहशतवादी आहेत. एनआएच्या छाप्यानंतर रतलाम मध्यप्रदेश येथून फरार झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील भेंडीबाजार परिसरात वास्तव्य केले. मात्र मुंबईत असलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या जाळ्यांची त्यांना भिती वाटत होती. एकेदिवशी आपण पकडले जावू याची धास्ती होती. त्यामुळे ते चार दिवसानंतर पुण्यात आले. पुण्यात घातपाती कारवाया करण्याचा त्यांचा डाव होता, की पुण्यात लपून महाराष्ट्रासह देशात इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत ते होते का, याचा देखील तपास आता यंत्रणांकडून केला जातो आहे.

दहशतवाद्यांची कसून चौकशी : कोथरुड पोलिसांनी दहशतवादी पकडलेल्या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील एटीएस शहर पोलीस दलालीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर शनिवारी एटीएसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोघा दहशतवाद्यांची कसून चौकशी केली. दोघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचे परिक्षण केल्यानंतर मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने एटीएसचा तपास सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?
  2. Pune crime News : सुफा दहशतवादी संघटनेतील दोघांना 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी

Last Updated : Jul 23, 2023, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.