ETV Bharat / state

दौंडमध्ये गावठी दारु अड्डयांवर पोलिसांचा छापा, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त - dound latest news

पोलिसांनी नांदूर, शेलारवाडी, थोरातवाडी, कानगाव, बोरीपारधी चौफुला व वाखारी अशा 6 ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गावठी दारू तयार करण्याचे 11 हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.

dound
दौंडमध्ये गावठी दारु अड्डयांवर पोलिसांचा छापा
author img

By

Published : Apr 13, 2020, 10:38 AM IST

पुणे - यवत पोलिसांच्या पथकाने दौंड तालुक्यातील गावठी दारु निर्मिती अड्डयांवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी नांदूर, शेलारवाडी, थोरातवाडी, कानगाव, बोरीपारधी चौफुला व वाखारी अशा 6 ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गावठी दारू तयार करण्याचे 11 हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे. तर 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लैली मच्छिंद्र गुडदावत (रा. नांदूर, ता. दौंड), मेनका गंगापूतर गुडदावत (रा. गाडमोडी, खामगाव, ता. दौंड), रुक्साना नितेश गुडदावत (रा. नांदूर, ता. दौंड), दिलीप यदु गव्हाणे (रा. कानगाव, ता. दौंड) व अन्य 2 जण अशा 6 जणांवर यवत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे, पोलीस नाईक गणेश पोटे, संतोष पंडित, दशरथ बनसोडे, सहाय्यक फौजदार संतोष शिंदे, विशाल गजरे, दत्तात्रय खाडे, हेमंत कुंजीर, नारायण जाधव, तानाजी साबळे, महिला पोलीस शुभांगी भोसले यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.