ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध दारू विक्री आणि ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध दारू विक्री आणि ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Illegal alcohol
अवैद्य दारू
author img

By

Published : Nov 12, 2020, 8:40 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात अवैद्य दारू विक्री आणि ऑनलाईन जुगार मटक्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथक आणि निगडी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी हॉटेल चालक शाम तापकीर, संतोष जाधव, यांच्यासह हॉटेलमध्ये असलेल्या पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार जणांसह 24 जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी पवळे उड्डाण पुलाखाली काही व्यक्ती ऑनलाइन जुगार चालवत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी निगडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला.

4 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त-

यात, जुगार चालविणारा मालक, चालक व जुगार खेळणाऱ्या एकूण 24 जणांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 63 हजारांचे 13 मोबाईल, 55 हजारांचे जुगार खेळण्याचे साहित्य, 6 दुचाकी, असा एकूण 4 लाख 17 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईमध्ये 15 जणांवर गुन्हा दाखल-

दुसऱ्या कारवाईमध्ये अवैद्य दारू विक्री करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. वडमुखवाडी येथे द्वारका फॅमिली गार्डन रेस्टॉरेन्ट मध्ये अवैधरित्या देशी, विदेशी दारू व बिअरची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून हॉटेलमधील दहा हजार रोख रक्कम, 39 हजारांच्या बिअर, विदेशी दारू असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालक शाम तापकीर, संतोष जाधव यांच्यासह इतर 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- कोविड १९ चे रुग्ण शोधण्यासाठी सर्वात जास्त चाचण्या घेणारा भारत हा जगातील दुसरा देश

हेही वाचा- ओडिशाच्या एका गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.