पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करुन अटक करण्यात आली आहे. शरीफ बबन मूलाणी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले होते.
दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला गुन्हेगार शुक्रवारी येरवडा कारागृहात पॅरोलवर सुटला होता. तेव्हा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडाविरोधी पथकातील कर्मचारी शरीफ मुलाणी हा त्या ठिकाणी स्वागतासाठी गेला होता. दुचाकी आणि चारचाकीतून कारागृहातून सुटलेल्या आरोपीची रॅली काढण्यात आली होती. तेव्हा, विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधितांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
दरम्यान, मुलाणी याची ड्युटी ही भोसरी परिसरात होती. मात्र, प्रत्यक्षात तिथे उपस्थित न राहता येरवडा या ठिकाणी जाऊन गुन्हेगाराची रॅली काढली. दरम्यान, एका मोटारीत एक गावठी पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत.
याप्रकरणी शरीफ मुलाणी याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मध्यरात्री दिले होते.
'त्या' पोलीस कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन; आरोपीची रॅली काढणं पडलं महागात - Pimpri chinchwad police Suspended
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला गुन्हेगार शुक्रवारी येरवडा कारागृहात पॅरोलवर सुटला होता. तेव्हा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडा विरोधी पथकातील कर्मचारी शरीफ मुलाणी हा त्या ठिकाणी स्वागतासाठी गेला होता. दुचाकी आणि चारचाकीतून कारागृहातून सुटलेल्या आरोपीची रॅली काढण्यात आली होती.