पुणे - पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिंड काढली आहे. शनिवार रोजी अज्ञात सहा आरोपी आणि दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने एकावर जीवघेणा हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. त्यांना आम्ही घटनास्थळी घेऊन जात होतो अस सांगितले आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांची धिंड काढली असल्याचे बोलले जाते आहे.
शुभम निवृत्ती कवठेकर, दिपक नाथा मिसाळ, मंगेश मोतीलाल सपकाळ, कैलास हरिभाऊ वंजारी, आकाश महादेव कांबळे, सनी गौतम गवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी येथे शनिवारी अज्ञात सहा जनांच्या टोळक्यासह दोन अल्पवयीन मुलांनी घराबाहेर बसलेल्या आकाश दत्तात्रय पवार यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने पूर्ववैनस्यातून कोयत्याने वार केले होते. तसेच, खिडकी, दरवाजा आणि बाहेरील महानगर पालिकेच्या पथदिव्यांवर कोयत्याने मारत त्या दिशेने दगडे फेकत दहशत पसरविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गंभीर प्रकरण असल्याने तातडीने तपास पथक तयार करून काही तासात सहा आरोपी आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. ज्या ठिकाणी आरोपीनी तोडफोड करत एकावर हल्ला केला होता. तसेच दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी वाकड पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे.
"संबंधित आरोपींची धिंड काढली नाही. घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले हत्यारे जप्त करायची होती. त्याकरिता त्यांना आम्ही घेऊन गेलो होतो."
पिंपरी-चिंचवडमध्ये तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड - पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी येथे शनिवारी अज्ञात सहा जनांच्या टोळक्यासह दोन अल्पवयीन मुलांनी घराबाहेर बसलेल्या आकाश दत्तात्रय पवार यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार केले होते. तसेच, खिडकी, दरवाजा आणि बाहेरील महानगर पालिकेच्या पथदिव्यांवर कोयत्याने मारत त्या दिशेने दगडे फेकत दहशत पसरविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे.