पुणे Police Custody To Rehan Sheikh: पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, रेहान शेख हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये ड्रग्ज पुरवठा करायचा. त्याचबरोबर ड्रग्ज माफियांकडून पैसे सुद्धा घ्यायचा. यातीलच एक आरोपी इमरान शेख हा देखील पोलिसांना हवा आहे. त्यासाठी रेहान शेखची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटलं होतं.
आरोपींना एकत्र बसवून चौकशी करणे बाकी: यापूर्वी ललित पाटील प्रकरणात त्याचा भाऊ भूषण पाटील, त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे त्याचबरोबर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम तसेच दत्ता डोके यांना अटक केली गेली. या सगळ्या आरोपींना एकमेकांसमोर बसवून चौकशी करायची आहे. त्यातून आणखी माहिती घ्यायची असल्याने ही कोठडी मागण्यात आली होती. कालच पुणे पोलिसांनी रेहान शेखला मुंबईमधून तळोजा कारागृहातून आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज त्याला पुणे कोर्टात सादर करण्यात आलं. पुणे कोर्टाने त्याला 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ललित पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे थेट संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचे आमदार गायकवाड म्हणाले आहेत.
नाशिकच्या पान टपरीवर ड्रग्ज पोहोचले: ड्रग्स माफिया ललित पाटीलचं नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सातत्त्यानं सरकारवर निशाणा साधत आहेत. 'नाशिक तीर्थक्षेत्र आहे, मात्र आता नाशिकमध्ये गल्ली गल्लीत पान टपरीवर ड्रग्ज पोहचले आहेत. त्याविरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल. राजकीय पुढाऱ्याशिवाय नशेचा बाजार कसा सुरू आहे? ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत', असं राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड: संजय गायकवाड यांनी थेट ललित पाटीलचा संबंध संजय राऊतांशी जोडला. ते म्हणाले की, याच ललित पाटीलला मातोश्रीवर शिवबंधन बांधून त्यांना पक्षाचं कवच कुंडल दिलं, त्याला शहर प्रमुख केलं. मात्र, त्याअगोदरही त्यावर अनेक गुन्हे दाखल होते. उद्धव ठाकरेंना हे माहीत नव्हतं का? तरीही त्याला मुद्दाम पक्षात घेतलं. त्यामुळं तरुण बरबाद होत आहेत. संजय राऊत यांनाच बेड्या ठोकल्या पाहिजेत. तसंच याप्रकरणी संजय राऊत यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही संजय गायकवाड यांनी यावेळी केली.
हेही वाचा:
- Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
- Nitesh Rane : दसरा झाल्यावर अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- Ajit Pawar : 'कंत्राटी भरतीनं नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला, आता माफी...', अजित पवारांची टीका