पुणे: पुण्यातील एका आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेवर पाळत ठेवणाऱ्या दोन गुप्तहेरांना पोलिसांनी अटक (Police arrested two detectives) केली आहे. आपला कुणीतरी पाठलाग करतोय (spying on a woman), आपली माहिती आपले फोटो, आपले ठिकाण तपासून घेत आहे असा या महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून संशय होता. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास (stalking a woman by spies) करून या दोघांना ताब्यात घेतले आहे. एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनात असे लोक सहभाग घेऊ शकतात का? हा देखील आता प्रश्न पुण्यात निर्माण झालेला आहे.
महिलेचे काढले फोटो : दोन गुप्तहेरांना गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकाने पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसरातून अटक केली आहे. निलेश लक्ष्मणसिंह परदेशी आणि राहुल गुणवंतराव बिराजदार अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोघेही गुप्तहेर आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेचा गेल्या महिन्याभरापासून पाठलाग करून तिचे फोटो काढत होते. याबाबत पीडित महिलेने पुण्याच्या भरोसा सेल पथकाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यांच्यावर पाळत ठेवून त्यांना अटक केली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ माजली.
दोघांचाही पेहराव पोलिसांसारखाच : दोन्हीही गुप्तहेर हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पीडित महिलेला गेल्या महिन्याभरापासून ती जात असलेल्या, हॉटेल्स मॉल आणि खासगी ठिकाणी पाठलाग करून तिचे फोटो आणि इतर खासगी माहिती कोणाला तरी पुरवत असल्याचा संशय पीडितेला आला होता. दोघांचाही पेहराव अगदी हुबेहूब पोलिसांसारखा होता. काही दिवसांपूर्वी या महिलेला संशय वाटल्यानंतर या महिलेने तक्रार दिली होती. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत दोघांनाही अटक केली. या दोन्हीही डिटेक्टिव्हना या महिलेची माहिती कोणी काढायला लावली होती. याचा तपास आता पोलिस करत आहेत.