पिंपरी-चिंचवड (पुणे) - जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या साथीदाराला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत या चोरट्याने ८७ घरफोड्या केल्याचे उघड झाले असून घरफोडी केल्याची सीसीटीव्हीत निदर्शनास आल्यानंतर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत असे. जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असे अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोरट्याचे नाव असून साथीदार सचिन धनराज पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या कारवाईमध्ये किरण राठोड आणि भगतसिंग भादा ला बेड्या ठोकल्या असून दोन्ही कारवाईमध्ये १० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात २० ते सोने आणि २० किलो चांदीचा समावेश आहे.
हेही वाचा - धक्कादायक! मादी श्वानावर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल
डोंगराळ भागातून आरोपीला ठोकल्या बेड्या...
तर दुसऱ्या कारवाईमध्ये चिकन दुकान मालकाच्या गळ्याला कोयता लावून गल्ल्यातील पैसे लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिघी परिसरात चिकन दुकानात बजळजबरी घुसून कोयत्याचा धाक दाखवून दोन चोरट्यांनी गळ्यातील पैसे घेतले होते. तसेच वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी राठोड आणि भादा या दोन्ही आरोपींचा शोध भोसरी पोलीस घेत होते. मात्र, ते दोघे कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात होते. ते खेड येथील डोंगराळ भागात लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही कारवाईमध्ये ऐकूण २० तोळे सोने आणि २० तोळे चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
हेही वाचा- मनसुख हिरेन प्रकरणाचे गुढ वाढले; हिरेन यांच्या मृत्यू ठिकाणी आढळला आणखी एक मृतदेह