ETV Bharat / state

माणुसकी! चालक आणि कंडक्टरच्या मदतीमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण - गर्भवती महिलेची मदत

ही महिला 3 किलोमीटर पायी प्रवास करून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांना मदत मागत होती. मात्र, मदत करायला कोणीही तयार नव्हते. महिलेने 4 ते 5 वेळा रुग्णावाहिकेलाही कॉल केला, मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. अशा वेळेस तरी लोकांनी पुढे येऊन मदत करायला हवी, असा सल्ला देत घडलेल्या प्रकाराबद्दल चालक आणि कंडक्टर यांनी खंत व्यक्त केली. तसेच नागरिकांनी या कठीण काळात गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले.

चालक आणि कंडक्टरच्या मदतीमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण

author img

By

Published : Apr 12, 2020, 10:12 AM IST

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त काही अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. अशात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पीएमपीएमच्या चालक आणि कंडक्टरने एका गर्भवती महिलेची मदत करून त्या महिलेचे प्राण वाचवले.

चालक फिरोज हमीद खान आणि कंडक्टर विजय मोरे हे स्वारगेट डेपोत काम करतात. शुक्रवारी हे दोघेही नांदेड सिटी ते डेक्कन मार्गावर अत्यावश्यक सेवेतील पीएमपीएल बसमध्ये काही प्रवासी घेऊन जात होते. यावेळी माणिकबाग परिसरात एक महिला रस्त्यावर येऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना मदत मागत होती. हे दृश्य पाहून चालक हमीद यांनी बस थांबवून त्या महिलेची विचारपूस केली आणि कोणतीही पर्वा न करता त्या महिलेला कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.