ETV Bharat / state

PM Narendra Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन; अजित पवारांनी केले पुणेकरांच्या सहनशीलतेचे कौतुक - PM Narendra Modi In Pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

PM Narendra Modi
मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच उद्घाटन संपन्न
author img

By

Published : Aug 1, 2023, 7:07 PM IST

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यावर भाषणात ते म्हणाले की, ऑगस्ट महिना उत्सव आणि क्रांतीचा महिना आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच मला पुण्यात येण्याचे सौभाग्य मिळाले. तसेच आज साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. अण्णाभाऊ साठे हे महान समाजसुधारक होते. बाबासाहेबांच्या विचारांनी ते प्रभावित होते. त्यांनी लिहिलेले साहित्य आजही अनेकांना प्रभावित करते. अनेक विद्यार्थी आजही त्यांच्या साहित्यावर शोध प्रबंध लिहीत असतात.

आजघडीला 20 शहरात मेट्रोचे नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, शहरात राहणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचवायचे असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. त्यासाठी आमचे सरकार मेट्रोवर भर देत आहे. उड्डाणपूल बांधले जात आहेत. 2014 मध्ये फक्त 5 शहरात मेट्रोचे नेटवर्क होते. आजघडीला 20 शहरात मेट्रोचे नेटवर्क आहे. मेट्रो आधुनिकी भारताच्या शहरातील लाईफलाईन बनत आहे. त्यामुळे आमचे सरकार मेट्रो नेटवर्क वाढवण्यावर भर देत आहे, असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले.

कर्नाटकमध्ये सरकार बदलले : यावेळी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला टोला देत म्हटले की, एकीकडे महाराष्ट्रात विकास होत आहे तर दुसरीकडे शेजारचे राज्य कर्नाटक तिथे काय होत आहे ते आपल्या समोर येत आहे. बंगळूरू मोठे आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. कर्नाटकाचा गतीने विकास होणे अपेक्षित होते. परंतु सरकार बदलले आणि जनतेचे तिथे नुकसान झाले आहे. तिथे ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत. ही परिस्थिती देशासाठी खूप चिंताजनक आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे, असे देखील यावेळी पंतप्रधान म्हणाले.

'या' सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची गॅरंटी : आज जगभरातील लोक भारताच्या विकासाची चर्चा करत आहेत. 2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. मागील 9 वर्षात आमच्या सरकारने गाव आणि शहरात 4 करोड घरे तयार केली आहेत. शहरी गरिबांसाठी 75 लाख घरे आम्ही तयार केली आहेत. आज आम्ही जी घरे तयार करत आहोत त्यातील सर्वाधिक घरे ही महिलांच्या नावावर केली जात आहेत. या घरांची किंमत देखील काही लाखात आहेत. या माध्यमातून मागील काही वर्षात अनेक बहिणी या लखपती झाल्या आहेत. आमच्या राज्यात गरीब असो की मध्यमवर्गीय या सर्वांची स्वप्ने पूर्ण करण्याची गॅरंटी आहे, असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राज्यात अडीच वर्षे अडकसिंग सरकार होते : यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, विद्याच्या माहेरघरामध्ये मोदी यांचे स्वागत करतो. मेट्रोमुळे मुंबईला जसा दिलासा मिळतो तसाच पुण्यालाही दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये महायुती सरकारने केलेले काम आपल्यासमोर आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारने केलेल्या मदतीने आज राज्य विकासाकडे जात आहे. हे खऱ्या अर्थाने डबल इंजिन सरकार आहे. त्यानंतर अजित पवार आले. आता विकासासाठी काम पुढे होत आहे. आज जगाचे लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. राज्यात अडीच वर्षे खडकसिंग सरकार नव्हते तर अडकसिंग सरकार होते. त्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्य मागे गेले. आम्ही हा निर्णय घेतला नसता तर राज्य आणखी 10 ते 15 वर्षे मागे गेले असते, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तेव्हा तिघांचे रोल वेगळे होते : कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपल्यासाठी गौरवाचा दिवस आहे. पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा सुरू होत आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्पाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. दुसऱ्या टप्प्याचीही सुरुवात पंतप्रधान मोदीच करत आहेत हे महत्त्वाचे आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला आम्ही तिघेही उपस्थित होतो. पण तिघांचे रोल वेगळे होते. पण आता मात्र महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुणे सर्वोत्तम शहर करुन दाखवू तसेच 12 हजार घरांपैकी काहीचे अनावरण आणि भूमिपूजन आज होत आहे. पुण्याला लवकरच एक रिंग रोड आणि विमानतळ देणार आहोत, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान मोदी यांनी साथ दिली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी भाषणात सांगितले की, पुण्याच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान मोदी यांनी साथ दिली. देशाच्या विकासाचे ते नेतृत्व करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे. कारण जेव्हा मेट्रोची कामे होत होती. तेव्हा अनेक अडचणी आल्या. पण तुम्ही सहनशीलता दाखवलीत. पुणेकरांनी या कामामध्ये राजकारण न आणता साथ दिली. यावेळी अजित पवारांनी पुणेकरांच्या सहनशीलतेचे कौतुक केले.

हेही वाचा -

  1. Eknath Shinde Nap : मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांची ब्रह्मानंदी टाळी?, Video Viral
  2. PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'दगडूशेठ' गणपती चरणी लीन; 'हा' केला संकल्प
  3. PM Narendra Modi Speech : लोकमान्य टिळकांकडे दूरदृष्टी...; भाषणात पंतप्रधान मोदींकडून सावरकरांचाही उल्लेख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.