पुणे (पिंपरी-चिंचवड) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला देहूत (PM Narendra Modi Dehu Visit) येणार आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्तीचा, शिळा मंदिराचा त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. ज्या सभा मंडपातून मोदी वारकरी संप्रदायाला संबोधित करणार आहेत त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी राम मंदिर निर्मितीचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, कुरेकर महाराज हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. देहू संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्यासह इतर वारकरी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत - 14 जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. ज्या सभा मंडपातून नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत त्या सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, ह.भ.प कुरेकर महाराज यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्रातील वारकरी, दिंड्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. एकूण 30- 40 हजार जनसमुदाय येणार असल्याची माहिती विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Special Tukaram Pagdi For PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार होत आहे स्पेशल तुकाराम पगडी