ETV Bharat / state

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली - pipeline burst patas

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीस पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पाटस गावच्या हद्दीत वारंवार फुटत आहे. या जलवाहिनीतून प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह बाहेर येत असतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी जलवाहिनी बदलन्याची मागणी केली आहे.

pipeline burst patas
जलवाहिन फुटली पाटस
author img

By

Published : Dec 30, 2020, 7:50 PM IST

पुणे - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीस पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पाटस गावच्या हद्दीत वारंवार फुटत आहे. या जलवाहिनीतून प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह बाहेर येत असतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी जलवाहिनी बदलन्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - लोणावळ्याकडे पर्यटकांची पाठ! गर्दी ओसरली

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला वरवंड येथील व्हीक्टोरिया तलावातून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. ही जलवाहिनी पाटस गावातील दत्त मंदिरानजिक फुटली आहे. दत्त मंदिरात अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. जल वाहिनीतून वेगाने पाण्याचा प्रवाह बाहेर येत असतो, त्यामुळे भाविकांना ये जा करण्यात त्रास होऊ शकते. तसेच, जलवाहिनीपासून काही अंतरावर पाटस गाव तलावाचा भराव आहे. जलवाहिनी अधिक फुटली तर पाण्याच्या दाबामुळे तलावाच्या भरावाचे नुकसान होऊ शकते.

जलवाहिनी फुटून अपघात

पाटस गावात कारखाना रोड ते टोल प्लाझा पर्यंत रहदारी असून सदर जलवाहिनीच्या कडेला एक बसस्टॉप आहे. मागील काळात बसस्टॉप नजीक जलवाहिनी फुटून अपघात झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही जलवाहिनी वारंवार फुटत आहे. त्यामुळे, पाटस गावच्या हद्दीतील ही जलवाहिनी काढून त्या जागी नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी पाटस ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी होत आहे.

जलवाहिनी बदलण्याचा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता विजयानंद पेटकर यांनी सांगितले की, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीस पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून, जलवाहिनी बदलण्याचा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर झाला आहे. या प्रस्तावाची तांत्रिक मंजुरीसुद्धा ऑक्टोबर २०२० मध्ये झाली आहे. यानुसार निविदा प्रसिद्ध होऊन ती मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. मंजुरी नंतर पुढील ७-८ महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा - भारनियमनामुळे रात्री कडाक्याच्या थंडीत कांदा लागवड करण्याची शेतकऱ्यावर वेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.