ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटीचे रक्तचंदन पोलिसांनी पकडले, आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस - पिंपरी-चिंचवड गुन्हे बातमी

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत 6.420 टन रक्तचंदनाने भरलेला मालमोटार, एक चारचाकी मोटार व मोबाईल फोन, असा एकूण 6 कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 17, 2021, 9:25 PM IST

Updated : May 17, 2021, 10:56 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत 6.420 टन रक्तचंदनाने भरलेला मालमोटार, एक चारचाकी मोटार व मोबाईल फोन, असा एकूण 6 कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांचे चार साथीदार फरार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये 6 कोटीचे रक्तचंदन पोलिसांनी पकडले

निलेश विलास ढेरंगे, एम. ए. सलिम, विनोद प्रकाश फर्नांडिस, झाकीर हुसेन अब्दुलरेहमान शेख, मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी केली मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाईक वंदु गिरे आणि पोलीस हवालदार राजेंद्र काळे 12 मे रोजी गस्त घालत होते. ताथवडे येथे त्यांना एक पांढऱ्या रंगाची चारचाकी मोटार दिसली. त्या मोटारीला पुढे नंबर प्लेट नव्हती व मागील नंबर प्लेट ही अर्धवट तुटलेली होती. काहीजण चारचाकीजवळ थांबले असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यातील तिघांना पकडले आणि त्यांच्याकडे विचारणा केली. दरम्यान, पकडलेल्या तिघांच्या मागे थांबलेले दोघेजण अंधारात पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर निलेश ढेरंगे याच्या मोबाईल फोनची पाहणी केली. त्यावेळी त्यात रक्त चंदनाने भरलेल्या मालमोटारीचे फोटो दिसले.

पोलिसांना सापडली रक्तचंदनाने भरलेली मालमोटार

आरोपींनी रक्तचंदन चोरुन रक्तचंदनाने भरलेली मालमोटार निलकमल हॉटेल समोरील मोकळ्या जागेत ताथवडे येथे उभा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मालमोटारीजवळ जाऊन पाहणी केली. मालमोटारीमध्ये पाच ते सहा फुटाचे गोलाकार रक्त चंदनाचे 6.420 टन वजनाचे लाकडी ओंडके आढळले. सुरुवातीला पोलीसांनी निलेश, सलीम, विनोद या तिघांना अटक केली. त्यानंतर अन्य दोघांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 6.420 टन वजनाचे 207 नग रक्तचंदन लाकडाचे ओंडके, एक मालमोटार, एक कार, दोन मोबाईल फोन, असा एकूण सहा कोटी, 52 लाख, 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोन आरोपी हे दुबईचे असल्याचे उघड

अटक केलेल्या आरोपींचे आणखी चार साथीदार फरार आहेत. त्यातील दोघेजण दुबईचे आहेत. त्यामुळे या प्रकरणात वाकड पोलिसांनी रक्तचंदन तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आणले आहे.

हेही वाचा - दौंड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्या, 1 मेंढी मृत्युमुखी

Last Updated : May 17, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.