पुणे - दापोडी येथे एका तरुणाने तोंडाला रुमाल बांधला असतानादेखील विनामास्क फिरत असल्याचे सांगत पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस प्रशासनाने दीडशे रुपये दंड केला आहे. या प्रकरणाची व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या घटनेप्रकरणी तरुण प्रताप गुंजाळ याने विनाकारण दंड केल्याचा आरोप केला असून, पालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इतर तरुणांना पोलीस जाऊ देत होते, हे सांगूनही त्यांनी मलाच थांबवून रुमाल बांधला असतानाही दंड केला आहे. हा विनाकारण दंड केला असून, जे नागरिक विनामास्क फिरतात त्यांना सोडून आमच्यासारख्या तरुणांना टार्गेट करण्याच्या हेतूने दंड केला जात असल्याचे प्रतापचे म्हणणे आहे.