ETV Bharat / state

Plastic Free Pimpri Chinchwad Initiative : प्लॅस्टिक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव मिळवा.. पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना - पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम

पिंपरी-चिंचवड शहराला प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने एक अनोखा उपक्रम ( Plastic Free Pimpri Chinchwad Initiative ) सुरु केला आहे. महापालिकेने ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) ठरवून दिलेल्या हॉटेल्समध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा केल्यास नागरिकांना चहा अथवा वडापाव देण्यात येणार ( Give Plastic Bottles Get Tea Vadapav ) आहे.

प्लॅस्टिक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव मिळवा.. पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना
पिंपरी चिंचवड
author img

By

Published : Jan 8, 2022, 8:00 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्लॅस्टिक बाटल्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता एक नामी शक्कल लढवली ( Plastic Free Pimpri Chinchwad Initiative ) आहे. रिकाम्या पाण्याच्या आणि शितपेयाच्या प्लॅस्टिक बाटलीच्या मोबदल्यात आता महानगरपालिका ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) क्षेत्रातील काही हॉटेल्स कचरावेचक आणि नागरिकांना चहा किंवा वडापाव देणार ( Give Plastic Bottles Get Tea Vadapav ) आहेत.

प्लॅस्टिक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव मिळवा.. पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना

रस्त्याच्या कडेला बाटल्या पडून

पिंपरी-चिंचवड शहराला प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महानगर पालिकेने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शहरात दररोज शेकडोंच्या घरात प्लॅस्टिक शितपेय आणि पिण्याचा पाण्याच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला पडून असतात. हाच कचरा पर्यावरणाची हानी आणि शहर अस्वछ करतो. त्यामुळे 'रिकाम्या बाटल्या द्या अन चहा आणि वडापाव घ्या', असा उपक्रम पालिका राबवणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी दिली आहे.

नंतर लावणार विल्हेवाट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही वृत्तपत्रात जाहिरात देखील दिली आहे. हॉटेल चालकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिनरल वॉटरच्या पाच रिकाम्या बॉटलच्या मोबदल्यात एक चहा किंवा दहा रिकाम्या बॉटलच्या मोबदल्यात एक वडापाव दिला जाणार आहे. हे सर्व महानगर पालिकेने सुचवलेल्या हॉटेलमध्ये मिळणार ( Hotels In Pimpri Chinchwad ) आहे. हॉटेलकडून महानगरपालिका जमा झालेल्या बॉटल्स घेणार असून, त्यानंतर योग्य ती प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावली जाणार असल्याचे महानगर पालिकेकडून सांगण्यात आलं.

पहिलीच महानगरपालिका

मिनरल वॉटर बॉटलच्या कचऱ्याच्या मोबदल्यात चहा किंवा वडापाव देणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बहुतेक राज्यातील नव्हे तर देशातील पहिलीच महानगर पालिका आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकर महानगरपालिकेच्या या उपक्रमात कसा प्रतिसाद देतात आणि शहरातील मिनरल वॉटर बॉटलच्या कचऱ्याला कसं संपवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.