ETV Bharat / state

'कायदा तोडणाऱ्यांना अभय नाही; कारवाई होणारच' - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त लेटेस्ट न्यूज

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश संतप्त झाले आहेत. शिस्तीचे पालन न करणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

CP Krishna Prakash
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
author img

By

Published : Nov 6, 2020, 5:16 PM IST

पुणे (पिंपरी-चिंचवड) - कायदा तोडणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. मास्कविना फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांची थेट कॉलर पकडल्याची घटना ताजी असताना चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसाला किमान एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराने पोलीस आयुक्त संतप्त झाले.

पोलिसांवरील हल्ल्यांमुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश संतप्त झाले आहेत

नागरिकांना शिस्त सहन होत नाही -

आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना शिस्तीची सवय नव्हती. आता लहान-मोठ्या चुकांवर कारवाई केली जात आहे. हा प्रकार त्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते आता आक्रमक होत आहेत. शहरातील सांगवी आणि चिंचवड परिसरात घडलेल्या घटनांबाबत आरोपींना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालण्यास देऊ नका, असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी पालकांना केले आहे. कायदा तोडणार असाल तर, तुमच्यावर कारवाई होणार, असा इशारा त्यांनी शहरवासीयांना दिला आहे.

काय झाले होते चिंचवडमध्ये -

चिंचवडमध्ये पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत हे पेंडिंग पावत्या करत होते. तेव्हा त्यांनी एका मोटारचालकाला थांबवले व मोटारीच्या पुढे येऊन चालकाला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, चालकाने मोटार तशीच वेगात पुढे नेली. त्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला जीव वाचवण्यासाठी बोनेटवर चढावे लागले. त्यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून वाहनचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला नेले. या प्रकरणी युवराज किसन हनवते (वय 49 रा. पिंपळे निलख) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - व्हिडिओ : 'त्या' वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मोटारीच्या बोनेटवर बसवून नेले एक किलोमीटर..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.